उषा जाधव वीरप्पन चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 13:56 IST2016-04-22T08:26:20+5:302016-04-22T13:56:20+5:30

वीरप्पनची कहाणी ही जगजाहीर आहे. वीरप्पनला ठार मारण्यासाठी सरकारने २० कोटी रुपए खर्च केले होते, वीरप्पनला २००४ साली ठार ...

Usha Jadhav Veerappan in the film | उषा जाधव वीरप्पन चित्रपटात

उषा जाधव वीरप्पन चित्रपटात

रप्पनची कहाणी ही जगजाहीर आहे. वीरप्पनला ठार मारण्यासाठी सरकारने २० कोटी रुपए खर्च केले होते, वीरप्पनला २००४ साली ठार मारण्यात सरकारला यश आलं, वीरप्पनवर सरकारी अधिकारी आणि पोलिसांना ठार मारण्याचे मोठे गुन्हे होते. अशा या सुपरहीट चित्रपटाच्या कहाणीत मराठमोळी अभिनेत्री उषा जाधव झळकणार आहे. नुकताच कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे, यामध्ये ही अभिनेत्री दिसली आहे.  रामगोपाल वर्मा यांचा हा चित्रपट आहे. तसेच ही अभिनेत्री यापूर्वी मधुर भांडारकर यांच्या ट्रफिक सिग्नल या चित्रपटातदेखील दिसली होती. या बॉलीवुडच्या तगडया दिग्दर्शकांबरोबरचे काम पाहता तिने बॉलीवुड व मराठी इंडस्ट्रीतदेखील आपले स्थान निर्माण केले असल्याचे आहे. तसेच या सुंदर अभिनेत्रीला मराठी इंडस्ट्रीत ढग या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.

Web Title: Usha Jadhav Veerappan in the film