प्रिया-उमेशच्या संसाराची १४ वर्ष, बलून फाईटचा गोड Video Viral
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:04 IST2025-10-06T12:01:48+5:302025-10-06T12:04:42+5:30
या गोड व्हिडीओमुळे चाहत्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आनंद पुन्हा एकदा अनुभवता आला.

प्रिया-उमेशच्या संसाराची १४ वर्ष, बलून फाईटचा गोड Video Viral
Umesh Kamat Priya Bapat Balloon Fights Video: प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्याकडे मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणून पाहिलं जातं. लग्नाआधी जवळपास ८ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०११ मध्ये प्रिया-उमेशने लग्नगाठ बांधली. मराठमोळ्या पद्धतीत या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. या दोघांच्या लग्नाला आता १४ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि अजूनही नव्या प्रेमात असल्यासारखी ही जोडी नेहमीच सोशल मीडियावर दिसून येते. या गोड कपलने एक गोड व्हिडीओ पोस्ट केला आहे. प्रिया आणि उमेश हे दोघंही जेव्हा सोबत फोटो, व्हिडीओ शेअर करतात तेव्हा चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होतो. असंच काहीसं आता झालं आहे.
प्रियानं उमेशसोबतचा एक खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ही जोडी बलून फाईट खेळताना दिसत आहेत. प्रियानं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलं, "गुलाब कुणाला हवेत, जेव्हा तुम्ही बलून फाईट खेळू शकता". उमेशवरील प्रेम व्यक्त करत प्रियानं म्हटलं की, "१४ वर्षांचं प्रेम, हास्य आणि थोडा वेडेपणा... हे लग्न आहे आणि हे नेहमीच असेच राहू दे". प्रिया आणि उमेशच्या या गोड व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरुन प्रेमाचा वर्षाव केलाय. प्रिया आणि उमेशची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री जितकी हिट आहे, तितकीच त्यांची ऑफ-स्क्रीन केमिस्ट्रीही चाहत्यांना खूप आवडते. त्यांच्या या गोड व्हिडीओमुळे चाहत्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आनंद पुन्हा एकदा अनुभवता आला.
१२ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर
प्रिया आणि उमेश नेहमीच एकमेकांविषयी प्रेम जपतात आणि व्यक्त करताना दिसतात. कोणतीही मुलाखत असो अथवा सोशल मीडिया असो हे दोघेही आपले एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची संधी दवडत नाहीत. प्रिया आणि उमेश एकाच इंडस्ट्रीत काम करत असून एकमेकांच्या कामाचा आणि घेतलेल्या प्रोजेक्टचा आदर करतात. नाटकांमधून उमेश काम करताना दिसतो तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रिया अधिक काम करताना दिसते. विशेष म्हणजे हे क्युट कपल तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळालंय. १२ सप्टेंबर रोजी त्यांचा 'बिन लग्नाची गोष्ट' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. गेल्या काही वर्षांपासून दोघांचे चाहते त्यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहाण्यासाठी उत्सुक होते.