उमेश कामतचा हा हॉट लूक फॅन्समध्ये चर्चेचा विषय, पिळदार बॉडी आणि स्टायलिश लूकने करतोय साऱ्यांना घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 13:30 IST2018-11-28T13:26:50+5:302018-11-28T13:30:43+5:30

नुकताच त्याने सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचा हा हॉट फोटो त्याच्या फॅन्सना भावला आहे. या फोटोमधील त्याची बॉडी पाहून कुणीही घायाळ होईल.

Umesh Kamat latest click with sexy body and stylish look will stunned you | उमेश कामतचा हा हॉट लूक फॅन्समध्ये चर्चेचा विषय, पिळदार बॉडी आणि स्टायलिश लूकने करतोय साऱ्यांना घायाळ

उमेश कामतचा हा हॉट लूक फॅन्समध्ये चर्चेचा विषय, पिळदार बॉडी आणि स्टायलिश लूकने करतोय साऱ्यांना घायाळ

मराठी चित्रपटसृष्टीतील एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे अभिनेता उमेश कामत. आपल्या अभिनयाने उमेशने रसिकांची मनं जिंकली आहेत. उमेश सोशल मीडियावरही बराच सक्रीय आहे. या माध्यमातून उमेश आपल्या फॅन्सशी जोडला गेला आहे. त्यांच्याशी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी संवाद साधतो, स्वतःचे फोटो आणि सिनेमाची माहिती तसंच व्हिडीओ तो शेअर करत असतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचा हा हॉट फोटो त्याच्या फॅन्सना भावला आहे. या फोटोमधील त्याची बॉडी पाहून कुणीही घायाळ होईल.

फोटोमधील आकर्षक तसंच तितकीच पिळदार बॉडी आणि स्टायलिश लूक सध्या साऱ्यांनाच भावतो आहे. या फोटोला त्याने हॅलो सॅटर्डे अशी कॅप्शन दिली आहे. लवकरच उमेश कामत पत्नी प्रिया बापटसह एका सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. जवळपास ४ वर्षांनंतर ही रिअल लाइफ जोडी रिल लाइफमध्ये एकत्र येणार आहे. मात्र या सिनेमाची कथा, दोघांची भूमिका याबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यामुळे उमेश आणि प्रियाच्या या आगामी सिनेमाची रसिकांना नक्कीच उत्सुकता असेल. उमेश कामतने दोघे एकत्र काम करत असल्याचे सोशल मीडियावर सांगितले असले तरी अद्याप या चित्रपटाची कथा व शीर्षक समजू शकलेले नाही. 

प्रिया आणि उमेश या दोघांची प्रेमकथा खूपच इंटरेस्टिंग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमात काम करत आहेत. त्यामुळे दोघांना एकमेकांबद्दल प्रचंड आदर होता आणि त्यामुळेच काम करता दोघांमध्ये मैत्रीचे बंधही निर्माण झाले. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २०११ मध्ये दोघे विवाह बंधनात अडकले. नवा गडी नवं राज्य हे सुपरहिट नाटकांमधून प्रिया-उमेश या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यानंतर आलेला टाईप्लीज हा त्यांचा सिनेमासुध्दा प्रेक्षकांच्या पसंतीस  उतरला. त्यामुळे आता त्यानंतर चार वर्षांनी हे कपल एकत्र झळकते आहे. 

 

Web Title: Umesh Kamat latest click with sexy body and stylish look will stunned you