'तुझी माझी रेशीमगाठ'मधील नेहाने खऱ्या आयुष्यातील नवऱ्यासोबतचा रोमँटिक व्हिडीओ केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 19:07 IST2021-10-12T19:06:55+5:302021-10-12T19:07:23+5:30

प्रार्थना बेहरे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Tuzi Mazi Reshimgath fame Neha Aka Prathana Behere shared video with real life husband Abhishek Jawkar | 'तुझी माझी रेशीमगाठ'मधील नेहाने खऱ्या आयुष्यातील नवऱ्यासोबतचा रोमँटिक व्हिडीओ केला शेअर

'तुझी माझी रेशीमगाठ'मधील नेहाने खऱ्या आयुष्यातील नवऱ्यासोबतचा रोमँटिक व्हिडीओ केला शेअर

झी मराठी वाहिनीवरील मालिका 'तुझी माझी रेशीमगाठ'ने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेला सुरूवातीपासून प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. या मालिकेत प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहरे या मालिकेत नेहाची भूमिका साकारते आहे. प्रार्थना सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या नवऱ्यासोबतचा रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे.

प्रार्थना बेहरे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती आणि तिचा नवरा अभिषेक जावकर रोमँटिक अंदाजात दिसते आहे. या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
प्रार्थना बेहरे आणि तिचा पती अभिषेक जावकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप भावते. रेशीमगाठीत अडकण्यापूर्वी प्रार्थना आणि अभिषेक खूप चांगले मित्र होते. त्यामुळेच त्याच्यातील हे नाते लग्नानंतर अधिक घट्ट झाले आहे. ते त्यांच्या फोटो आणि व्हिडीओतून पहायला मिळते. 


अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.
प्रार्थना बेहरेने 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय हिंदी मालिकेतून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिची पहिल्याच मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर तिने मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. 

Web Title: Tuzi Mazi Reshimgath fame Neha Aka Prathana Behere shared video with real life husband Abhishek Jawkar