'अन्याय सहन करणं माझ्या रक्तातच नाही..', तेजश्री प्रधानची लेटेस्ट पोस्ट आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 12:18 IST2022-03-11T12:18:09+5:302022-03-11T12:18:30+5:30

तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

'Tolerating injustice is not in my blood ..', Tejashri Pradhan's latest post viral | 'अन्याय सहन करणं माझ्या रक्तातच नाही..', तेजश्री प्रधानची लेटेस्ट पोस्ट आली चर्चेत

'अन्याय सहन करणं माझ्या रक्तातच नाही..', तेजश्री प्रधानची लेटेस्ट पोस्ट आली चर्चेत

कलाकार म्हटलं की कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. कधी कपड्यांवरून तर कधी फॅशन सेन्समुळे... वेगवेगळ्या कारणांमुळे सेलिब्रेटी ट्रोल होताना दिसतात. मात्र सेलिब्रेटी कधीकधी या कमेंट्सकडे कानाडोळा करतात तर कधी ट्रोलर्सला चांगलाच धडा शिकवतात. असेच काहीसे अभिनेत्री तेजश्री प्रधान(Tejashri Pradhan)सोबत घडले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने महिला दिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली होती. यात तिने लिहले की, मी दुःख उगाळत बसत नाही, चुकीच्या वागणाऱ्यांना मी सोडत नाही. माझ्यात लढा देण्याची ताकद आहे, व्यवस्थेची बळी मी ठरणार नाही, अन्याय सहन करणे माझ्या रक्तातच नाही. आयुष्य कसे हवे हे ठाऊक असले की यश मिळवणे सोप्पे होते. तिच्या या पोस्टचे अनेकांनी कौतुक केले आहे. तर काहींना प्रश्न पडलाय की, ही पोस्ट नेमकी तिने कोणासाठी लिहिली आहे.


तेजश्री प्रधान हिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अधिराज्य गाजविले आहे. होणार सून मी या घरची या मालिकेत जान्हवीच्या भूमिकेतून ती घराघरात पोहचली. त्यानंतर अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या पहिल्या पर्वात शुभ्राने तिच्या लोकप्रियतेत भरच घातली आहे. तसेच ती हिंदी चित्रपट बबलू बॅचलरमध्येही झळकली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शर्मन जोशी मुख्य भूमिकेत होता. बबलू बॅचलर या चित्रपटात शर्मन जोशी आणि तेजश्री प्रधान यांची जोडी जमली असून त्यांनी याआधी एका नाटकात काम केले होते. या नाटकाला रसिकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

Web Title: 'Tolerating injustice is not in my blood ..', Tejashri Pradhan's latest post viral