​‘बापजन्म’ चित्रपटाचा टिझर पोस्टर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2017 12:08 IST2017-07-17T06:38:22+5:302017-07-17T12:08:22+5:30

एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट प्रस्तुत ‘बापजन्म’ या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि सुमतिलाल ...

Tizzeran poster display of 'Bapjnam' movie | ​‘बापजन्म’ चित्रपटाचा टिझर पोस्टर प्रदर्शित

​‘बापजन्म’ चित्रपटाचा टिझर पोस्टर प्रदर्शित

्हरेस्ट एन्टरटेन्मेंट प्रस्तुत ‘बापजन्म’ या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि सुमतिलाल शाह यांनी केली आहे. युवा आणि प्रतिभाशाली निपुण धर्माधिकारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाचा एक हटके टिझर पोस्टर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट १५ सप्टेंबर २०१७ला प्रदर्शित होत आहे.
‘बापजन्म’ची प्रस्तुती मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडियाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाईम प्लीज, मुंबई-पुणे-मुंबई २ यांसारखे अनेक गाजलेले चित्रपट देणाऱ्या ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ची आहे. 
निपुण धर्माधिकारी हे नाव आज घराघरात पोहोचलेले नाव आहे आणि त्याचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्याने २००९मध्ये ‘नाटक कंपनी’ या संस्थेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून शतकांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या संगीत नाटकांचे पुनर्रुजीवन केले. त्या माध्यमातून शेक्सपियरच्या परंपरेलाही उजाळा दिला गेला. या नाटकांची मराठी रंगभूमीवर तर वाहवा झालीच पण त्याचबरोबर अमेरिकेतील आणि अगदी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या भारत रंगमहोत्सवातही त्यांना मानाचे स्थान मिळाले.
भविष्याचा वेध घेणारा दिग्दर्शक म्हणून निपुणची ख्याती आहेच, पण त्याचबरोबर त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाने आणि लेखनाने आपला ठसा उमटवला आहे. त्यात ‘नौटंकी साला’ (२०१३) आणि ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ (२००९) या चित्रपटांचा समावेश आहे. निपुणचे दिग्दर्शन असलेल्या ‘बापजन्म’ या आगामी चित्रपटाने रसिकांची उत्कंठा ताणली गेली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. 

Also Read : निपुण धर्माधिकारीचा हा सिनेमा रसिकांना देणार खास सरप्राईज!

Web Title: Tizzeran poster display of 'Bapjnam' movie