तीन भावांची लाडकी बहिण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 17:56 IST2016-06-30T12:26:57+5:302016-06-30T17:56:57+5:30

प्रत्येक भावासाठी आपली बहिण लाडकी असते. त्यात ती बहिण एकटी असेल तर तिचे लाड जास्तच होते. असे काहीसे चित्र अभिनेता भरत जाधव यांच्या घरात दिसत आहे. भरत जाधव या अभिनेत्याने सोशलमिडीयावर भाऊ-बहिणसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यावर त्याने स्टेटस लिहिले आहे की, आम्ही तीन भाऊ व आमची लाडकी बहिण.

Three siblings | तीन भावांची लाडकी बहिण

तीन भावांची लाडकी बहिण

ong>Exclusive - बेनझीर जमादार 

प्रत्येक भावासाठी आपली बहिण लाडकी असते. त्यात ती बहिण एकटी असेल तर तिचे लाड जास्तच होते. असे काहीसे चित्र अभिनेता भरत जाधव यांच्या घरात दिसत आहे. भरत जाधव या अभिनेत्याने सोशलमिडीयावर भाऊ-बहिणसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यावर त्याने स्टेटस लिहिले आहे की, आम्ही तीन भाऊ व आमची लाडकी बहिण. भरतचे हे स्टेटस पाहता, तुम्ही म्हणाल ना रक्षाबंधन ना भाऊबीज मग या फोटोमागचे कारण काय असू शकते? कारण हे फोटो फक्त या दोन सणांदिवशीच सोशलमिडीयावर पाहायला मिळत असतात. पण भरत जाधव यांंनी बहिणींचे प्रेम या सणादिवशीच मर्यादित नाही हे या फोटोच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. तसेच त्यांच्या भावाचा नुकताच ६१ वाढदिवस एकत्रित येऊन साजरा केला. त्यावेळी हा हॅपी क्षण क्लिक झाला आहे. खूप दिवसांनी हे भाऊ-बहिण एकत्रित आल्यामुळे खूपच आनंदित दिसत आहे. असो, या भाव-बहिणींची ही माया पाहता फुलो का तारो का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है..... हे गाण्याची आठवण येईन हे मात्र नक्की. 




 
 






      

Web Title: Three siblings