अशी झाली होती मकरंद अनासपुरे आणि त्यांच्या पत्नीची पहिली भेट; पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 07:00 IST2022-02-03T07:00:00+5:302022-02-03T07:00:00+5:30

Makrand Anaspure: फार कमी लोकांना माहित नाही की मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. मात्र सध्या त्या सिनेइंडस्ट्रीतून गायब आहेत.

This was the first meeting between Makrand Anaspure and his wife; The wife is also a famous actress | अशी झाली होती मकरंद अनासपुरे आणि त्यांच्या पत्नीची पहिली भेट; पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

अशी झाली होती मकरंद अनासपुरे आणि त्यांच्या पत्नीची पहिली भेट; पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

अभिनेता मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) यांनी आपल्या टॅलेंटच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. त्यांनी मराठी चित्रपटासोबतच हिंदी चित्रपटातही काम केले आहे. ‘डॅम्बीस’ या चित्रपटाचे पटकथालेखन, दिग्दर्शन व निर्मिती देखील त्यांनी केली आहे. फार कमी लोकांना माहित नाही की मकरंद अनासपुरे यांची पत्नी शिल्पा अनासपुरे या देखील अभिनेत्री आहेत. मात्र सध्या त्या सिनेइंडस्ट्रीत कार्यरत नाहीत. मकरंद आणि शिल्पा अनासपुरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

अभिनेता मकरंद अनासपुरे आणि शिल्पा अनासपुरे यांचे लव्हमॅरेज झाले आहे. शिल्पा मुळच्या मुंबईच्या आहेत आणि त्यांनी नाटक व चित्रपटात काम केले आहे. खरेतर २००० साली 'जाऊ बाई जोरात' या नाटकात काम करत असताना पहिल्यांदा शिल्पा आणि मकरंद यांची भेट झाली होती. याकाळात मकरंद यांचे शिल्पा यांच्यावर प्रेम जडले आणि त्यांनी शिल्पा यांना लग्नाची मागणी घातली.


शिल्पा यांनी लग्नासाठी होकार दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी याबद्दल सांगितले. विशेष म्हणजे दोघांचे हे इंटरकास्ट मॅरेज आहे. पण दोघांच्या घरातून अजिबात विरोध झाला नाही. ३० नोव्हेंबर २००१ रोजी औरंगाबादमध्ये दोघांचे लग्न झाले.

लग्नानंतर शिल्पा यांनी काही चित्रपटात मकरंद अनासपुरे यांच्यासोबत चित्रपटात काम केले. त्या दोघांनी ५ चित्रपटात एकत्र काम केले. कापूस कोंड्याची गोष्ट, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, सुंबरान, गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटात ते एकत्र झळकले आहेत. मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर चालवत असलेल्या नाम फाउंडेशनच्या कार्यातदेखील शिल्पा यांचादेखील मोलाचा वाटा आहे. 

Web Title: This was the first meeting between Makrand Anaspure and his wife; The wife is also a famous actress