या मराठमोळ्या अभिनेत्रीनं लंडनमध्ये मिळवली मास्टर्सची डिग्री, तिची आईसुद्धा आहे प्रसिद्ध अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 19:23 IST2022-03-09T19:16:32+5:302022-03-09T19:23:31+5:30
बॉलिवूडमधील अनेक स्टारकिड्स परदेशात शिक्षणासाठी किंवा उच्चशिक्षणासाठी जातात. मात्र यावेळी एक मराठी अभिनेत्रीने आपलं शिक्षण लंडनमध्ये पूर्ण केलं आहे.

या मराठमोळ्या अभिनेत्रीनं लंडनमध्ये मिळवली मास्टर्सची डिग्री, तिची आईसुद्धा आहे प्रसिद्ध अभिनेत्री
बॉलिवूडमधील अनेक स्टारकिड्स परदेशात शिक्षणासाठी किंवा उच्चशिक्षणासाठी जातात. शाहरुख खानची मुलगी सुहाना, अरबाज आणि मलायकाचा मुलगा अरहान हा देखील सध्या परदेशात आपलं शिक्षण पूर्ण करतो आहे. आता मराठी सिनेसृष्टीतील एका अभिनेत्रीने देखील लंडनमध्ये आपलं मार्स्टची पदवी प्राप्त केली आहे. लंडन येथील रॉयल अल्बर्ट हॉलमधून या अभिनेत्रीने रॉयल कॉलेज ऑफ आर्टस् विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
आम्ही बोलतोय अभिनेत्री सखी गोखले( sakhee gokhale ) बाबत गेले अनेक वर्षे ती लंडनमध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेली होती. या ठिकाणी ती पदवीचं शिक्षण घेत होते. आपल्या शिक्षणासाठी सखीने अमर फोटो स्टुडिओ हे नाटक देखील सोडले होते. सखीने Curating Contemporary Art या विषयातून सखीने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. सखीसोबत अनेकवेळा तिचा पती आणि अभिनेता सुव्रत जोशीदेखील लंडनमध्ये राहायचा.
''महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, कारण काल मी रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये आमच्या पदवी समारंभासाठी बसलो होतो (कोविडमुळे 2 वर्षे उशीर झाला आहे) मी फक्त स्वतःचा आनंद साजरा करत नाही, तर माझ्या कुटुंबातील महिलांचाही आनंद साजरा करत होतो. माझी आजी जिने तीन मुलांचे संगोपन करताना Phd पूर्ण केली आणि माझी आई जिने तिचे उच्च शिक्षण नाट्यक्षेत्रात पूर्ण केले. आणि, इतर अनेक विलक्षण महिला मी वाढताना पाहिल्या!'' आपल्या यशचे सारे श्रेय सखीने तिची आई आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांना आणि सुव्रत जोशीला दिलं आहे. तुमच्या प्रोत्साहनामुळेच मी हे करू शकले असे ती आवर्जून सांगताना दिसते. सखीच्या पोस्टवर अनेक मराठी सेलिब्रेटींनी तिचे अभिनंदन केलं आहे.