'दे धक्का'च्या सीक्वलमध्ये सायलीच्या भूमिकेत गौरी वैद्य ऐवजी दिसणार ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 09:00 IST2022-06-16T09:00:00+5:302022-06-16T09:00:01+5:30

De Dhakka 2: 'दे धक्का' चित्रपटात सायलीची भूमिका बालकलाकार गौरी वैद्य हिने साकारली होती. मात्र आता सीक्वलमध्ये या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.

This actress will be seen in the role of Sayali instead of Gauri Vaidya in the sequel of 'De Dhakka' | 'दे धक्का'च्या सीक्वलमध्ये सायलीच्या भूमिकेत गौरी वैद्य ऐवजी दिसणार ही अभिनेत्री

'दे धक्का'च्या सीक्वलमध्ये सायलीच्या भूमिकेत गौरी वैद्य ऐवजी दिसणार ही अभिनेत्री

२००८ साली दे धक्का (De Dhakka) चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत धमाल उडवली होती. मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर अशा कलाकारांचा समावेश असलेल्या या विनोदी चित्रपटाने सर्वांची मने जिंकली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल येत असून, मोशन पोस्टरसोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. 'दे धक्का' चित्रपटात सायलीची भूमिका बालकलाकार गौरी वैद्य हिने साकारली होती. मात्र आता सीक्वलमध्ये या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.

दे धक्का चित्रपटात सायलीची भूमिका अभिनेत्री गौरी वैद्य हिने साकारली होती. सध्या ती अभिनय क्षेत्रात सक्रीय नाही. आता ती २६ वर्षांची झाली असून तिने मुंबईतील माटुंगा येथील ‘डी. जी. रुपारेल’ महाविद्यालयामधून शिक्षण घेतल्यानंतर इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी’मधून पदवी घेतली आहे. दे धक्काच्या सीक्वलमध्ये आधीचे सर्व कलाकार आहेत. फक्त सायलीच्या भूमिकेत गौरी वैद्य ऐवजी गौरी इंगवले दिसणार आहे.

दे धक्का २ चित्रपट ५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरसोबत कलाकारांची ओळख करून देण्यात आली आहे. गौरी इंगवले ही मेधा मांजरेकर यांच्या पहिल्या नवऱ्याची लेक आहे. त्यामुळे आपल्या मुलांप्रमाणेच महेश मांजरेकर गौरीला देखील आपल्या मुलांप्रमाणेच सांभाळत आहेत.


गौरी हिने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली आहे. अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या 'कुटुंब' या चित्रपटात गौरीने बालकलाकार म्हणून काम केले होते. तसेच ओवी नाटकात तिने मध्यवर्ती भूमिका केली होती. शेवटची ती पांघरूण चित्रपटात झळकली. या चित्रपटातील तिच्या कामाची सर्वत्र खूप प्रशंसा झाली होती.

Web Title: This actress will be seen in the role of Sayali instead of Gauri Vaidya in the sequel of 'De Dhakka'