तेजस्विनी पंडितच्या नव्या फोटोशूटची होतेय चर्चा, दिसतेय खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 22:08 IST2020-12-17T22:07:52+5:302020-12-17T22:08:21+5:30

तेजस्विनी पंडितने नुकतेच नव्या फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत.

There is talk of Tejaswini Pandit's new photoshoot, it looks very glamorous | तेजस्विनी पंडितच्या नव्या फोटोशूटची होतेय चर्चा, दिसतेय खूप ग्लॅमरस

तेजस्विनी पंडितच्या नव्या फोटोशूटची होतेय चर्चा, दिसतेय खूप ग्लॅमरस

अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. इन्स्टाग्रामवर तिचे फोटो, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्टची माहिती ती चाहत्यांना देत असते. तेजस्विनीने नुकतेच एक फोटोशूट शेअर केले आहे. तिचे हे फोटोशूट पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. 

तेजस्विनी पंडितने नुकतेच नव्या फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत. यात तिने निळ्या रंगाचा वन पीस परिधान केला आहे. ज्यात ती बॅकलेस ड्रेसमध्ये दिसते आहे. यात ती खूप बोल्ड अंदाजात दिसते आहे. 


यापूर्वीदेखील तेजस्विनीने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बेडरूममधील या फोटोला तेजस्विनीने दिलेल्या कॅप्शनची खास चर्चा आहे. माझे जुने व्हर्जन डोक्यातून काढा. कारण त्याची मुदत आता संपलीये, असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.


मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.


तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजश्रीने काही वर्षांपूर्वी ‘अगं बाई अरेच्चा’ या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली होती.

Web Title: There is talk of Tejaswini Pandit's new photoshoot, it looks very glamorous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.