'नाच गं घुमा' नावाचं वादळ सगळ्यांना हसवतंय आणि..., मधुगंधा कुलकर्णीची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 19:30 IST2024-05-04T19:30:00+5:302024-05-04T19:30:00+5:30
Nach Ga Ghuma Movie : मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांचा 'नाच गं घुमा' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत होते. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

'नाच गं घुमा' नावाचं वादळ सगळ्यांना हसवतंय आणि..., मधुगंधा कुलकर्णीची पोस्ट चर्चेत
मुक्ता बर्वे (Mukta Barve) आणि नम्रता संभेराव (Namrata Sambherao) यांचा 'नाच गं घुमा' (Nach Ga Ghuma Movie) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत होते. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. समीक्षकांसह प्रेक्षकांनी या सिनेमाचं कौतुक केले आहे. दरम्यान आता मधुगंधा कुलकर्णी (Madhugandha Kulkarni) हिने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
अभिनेत्री आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी हिने इंस्टाग्रामवर बोर्डवाला बंदाची पोस्ट रिपोर्ट केली आहे. या पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे की, ''नाच गं घुमा''. आता सिनेमाविषयी बोलायचं तर सध्या नाच गं घुमा नावाचं वादळ सगळ्यांना हसवतंय आणि त्याचबरोबर रडवतंयसुद्धा. नक्की पहा. ही पोस्ट रिपोस्ट करत मधुगंधाने कॅप्शनमध्ये म्हटले की, नाच गं घुमा चित्रपट १ मे पासून प्रदर्शित झाला आहे तुमच्या जवळच्या थेटरात... हिरण्यागर्भ मनोरंजन निर्मित परेश मोकाशी दिग्दर्शित नाच गं घुमा.
पोस्टवरील प्रतिक्रिया
मधुगंधाच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करत चित्रपटाचं कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले की, खरंच खूपच छान आहे सिनेमा. मुक्ताचं काम तर काही तोडच नाही. सोबत नम्रताने सुद्धा छान काम केले आहे. खूप दिवसांनी असा सिनेमा पाहायला मिळाला. एक छान मेसेज आहे. लव्ह यू मुक्ता. दुसऱ्या युजरने म्हटले की, खूप छान सिनेमा. खूप मजा आली. आणखी एका युजरने लिहिले की, खूप छान आताच पाहिला. सगळ्या टीमला खूप सारे प्रेम. सगळ्यांनी नक्की पाहा. विशेषतः सर्व महिलांनी.
'नाच गं घुमा'बद्दल
परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' हा सिनेमा १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेरावसह या सिनेमात सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, सारंग साठ्ये, मायरा वायकुळ या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'नाच गं घुमा' सिनेमाने तब्बल २ कोटींचा गल्ला जमवला आहे.