"प्रयोग इतका देखणा व्हायचा की तो...", मुक्ता बर्वेनं 'कोडमंत्र' नाटकाच्या आठवणीला दिला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:44 IST2025-06-18T16:43:43+5:302025-06-18T16:44:03+5:30

Mukta Barve : मुक्ता बर्वे हिने कोडमंत्र नाटकाच्या सेटवरील फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

"The experiment was so beautiful that it...", Mukta Barve reminisced about the play 'Kodmantra' | "प्रयोग इतका देखणा व्हायचा की तो...", मुक्ता बर्वेनं 'कोडमंत्र' नाटकाच्या आठवणीला दिला उजाळा

"प्रयोग इतका देखणा व्हायचा की तो...", मुक्ता बर्वेनं 'कोडमंत्र' नाटकाच्या आठवणीला दिला उजाळा

मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे (Mukta Barve) हिचे नाव आवर्जून घेतले जाते. मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने आजवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. मुक्ता सोशल मीडियावर फारशी सक्रीय नाही. पण ती अधूनमधून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने कोडमंत्र नाटकाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मुक्ता बर्वे हिने कोडमंत्र नाटकाच्या सेटवरील फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले की, आज १८ जून, याच दिवशी ९ वर्षांपूर्वी ‘कोडमंत्र‘ नाटकाचा पहिला प्रयोग झाला. नाटक इतकं सुंदर होतं आणि प्रयोग इतका देखणा व्हायचा की तो अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही. आजही हे नाटक बघितलेले प्रेक्षक भेटतात तेव्हा या नाटकाची आठवण सांगितल्या शिवाय रहात नाहीत. या नाटकानी निर्माती म्हणून आणि अभिनेत्री म्हणून मला खूप शिकवलं. हे नाटक माझ्या आयुष्यात आलं याबद्दल मी कायम कृतज्ञ राहीन.


वर्कफ्रंट
मुक्ता बर्वेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती इंद्रायणी मालिकेत पाहायला मिळाली होती. तिची भूमिका फार छोटी पण लक्षवेधी होती. तसेच ती नाच गं घुमा या सिनेमात झळकली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमात मुक्ता शिवाय  नम्रता संभेराव यांच्याबरोबर सारंग साठ्ये, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, सुप्रिया पाठारे, सुकन्या मोने यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title: "The experiment was so beautiful that it...", Mukta Barve reminisced about the play 'Kodmantra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.