तेजस्विनीचा बोल्ड फोटो पाहिलात का ?, सोशल मीडियावर होतोय ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 06:00 IST2020-04-30T06:00:00+5:302020-04-30T06:00:00+5:30

तेजस्विनीच्या या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत.

Tejaswini Pundit share hot photo on insta gda | तेजस्विनीचा बोल्ड फोटो पाहिलात का ?, सोशल मीडियावर होतोय ट्रेंड

तेजस्विनीचा बोल्ड फोटो पाहिलात का ?, सोशल मीडियावर होतोय ट्रेंड

अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. लॉकडाऊनमध्ये तेजस्विनी तिचा हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअऱ केला आहे. तेजस्विनीचा हा बोल्ड अवतार चाहत्यांना आवडला आहे. सेलिब्रेटीनी तिच्या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत. डोळे हे जुलमी गडे, ब्युटीफुल अशा कमेंट्स तेजस्विनीच्या फोटोवर केल्या आहेत. तेजस्विनीच्या या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत.

तेजश्रीने काही वर्षांपूर्वी अगं बाई अरेच्चा या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. या चित्रपटात ती नकारात्मक भूमिकेत झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले.

मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी आज आघाडीची अभिनेत्रीच्या यादीत गणली जाते.

Web Title: Tejaswini Pundit share hot photo on insta gda