तेजस्विनी पंडितने शेअर केले स्टायलिश साडीतले फोटोशूट, सेलिब्रेंटीसह चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 16:15 IST2021-01-08T16:13:12+5:302021-01-08T16:15:35+5:30

सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Tejaswini pandit shares stylish saree photoshoot | तेजस्विनी पंडितने शेअर केले स्टायलिश साडीतले फोटोशूट, सेलिब्रेंटीसह चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

तेजस्विनी पंडितने शेअर केले स्टायलिश साडीतले फोटोशूट, सेलिब्रेंटीसह चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.लवकरच तेजस्विनी 'समातंर 'च्या दुसऱ्या सीझनमध्ये झळकणार आहे. 

 तेजस्विनी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. इन्स्टाग्रामवर तिचे फोटो, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्टची माहिती ती चाहत्यांना देत असते. नुकतेच तेजस्विनी तिच्या इन्स्टाग्रामवर इंडो वेस्टर्न साडीतले फोटो शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. चाहत्यांसह सेलिब्रेटींनाही तिचे हे स्टायलिश फोटोशूट आवडले आहे. त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजश्रीने काही वर्षांपूर्वी अगं बाई अरेच्चा या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली.

Web Title: Tejaswini pandit shares stylish saree photoshoot