तेजस्विनी पंडितने फोटो शेअर करत आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, तिची आईदेखील आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 16:05 IST2021-09-01T16:04:01+5:302021-09-01T16:05:00+5:30

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने वेगवेगळ्या भूमिकांतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

Tejaswini Pandit shares photos and wishes happy birthday to her mother, her mother is also an actress | तेजस्विनी पंडितने फोटो शेअर करत आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, तिची आईदेखील आहे अभिनेत्री

तेजस्विनी पंडितने फोटो शेअर करत आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, तिची आईदेखील आहे अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने वेगवेगळ्या भूमिकांतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आईदेखील अभिनेत्री आहे. तिच्या आईचे नाव ज्योती चांदेकर असून आज त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने तेजस्विनीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले की, एका गोष्टीसाठी मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन. मला तुझ्या कलेचा वारसा पुढे चालवण्याचा मान दिलासंच पण कर्तबगारीचा वारसा दिल्याबद्दल. तुझ्या बहारदार अभिनयाने तू कायमच लोकांना भुरळ घातलीस...तुझ्या पायाच्या नखाची सर जरी मला लाभली तरी मी अभिनेत्री होणं सार्थकी लागलं असं समजेन मी... बाकी अशीच पाठीशी रहा, पण थोडी पाठ सोड आणि तू वृद्ध झाली आहेस हे मान्य कर.


तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजस्विनीने देखील सिनेसृष्टीत पदार्पण केले.

मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेत तेजस्विनीने काम केले. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. 

Web Title: Tejaswini Pandit shares photos and wishes happy birthday to her mother, her mother is also an actress