'किती तरी भेटी अश्याच राहून गेल्या...', म्हणत तेजस्विनी पंडितने शेअर केला हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 07:00 IST2021-07-04T07:00:00+5:302021-07-04T07:00:00+5:30

तेजस्विनी पंडितची नुकतीच समांतर २ ही वेबसीरिज रिलीज झाली आहे.

Tejaswini Pandit shared this photo saying, "How many visits have remained the same ..." | 'किती तरी भेटी अश्याच राहून गेल्या...', म्हणत तेजस्विनी पंडितने शेअर केला हा फोटो

'किती तरी भेटी अश्याच राहून गेल्या...', म्हणत तेजस्विनी पंडितने शेअर केला हा फोटो

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा चर्चेत येत असते. तेजस्विनी पंडितची नुकतीच समांतर २ ही वेबसीरिज रिलीज झाली आहे. त्यानंतर आता तिने समांतर २मधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या फोटोसोबत तिने दिलेली कॅप्शन सध्या चर्चेत आली आहे.

तेजस्विनी पंडितने समांतर २मधील फोटो शेअर करत लिहिले की, किती तरी भेटी अश्याच राहून गेल्या,दाटून भाव प्रेमाचे नजरेत साठून गेल्या....!!!
तेजस्विनी पंडित या फोटोसोबत तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. समांतर २मध्ये तेजस्विनी पंडितने निमा कुमार महाजनची भूमिका साकारली आहे. 'समांतर'च्या पहिल्या सीझनमध्ये बोल्ड सीनमुळे चर्चेत आलेली तेजस्विनी पुन्हा एकदा 'समांतर 2' मध्ये बोल्ड अंदाजात पहायला मिळाली. 


'समांतर'ने आपल्या उत्तम कथानकाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. 'समांतर' ला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर प्रेक्षक गेले वर्षभर वेबसीरिजच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत होते. स्वप्नीलला देखील 'समांतर'च्या पुढच्या भागाबद्दल विचारणा होत होती. आता 'समांतर-२' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वेबसीरिजचा दुसरा सीजनही प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्याचे दिसत आहे.


तेजस्विनी पंडित आणि स्वप्नीलसोबत अभिनेत्री सई ताम्हणकर देखील वेबसीरिजमध्ये महत्वाच्या भूमिकेत पहायला मिळते आहे. सई, तेजस्विनी आणि स्वप्नीलने यापूर्वी 'तू ही रे' या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर या वेबसीरिजमध्ये ते एकत्र काम करताना दिसले.

Web Title: Tejaswini Pandit shared this photo saying, "How many visits have remained the same ..."