तेजस्विनी पंडीत पोहोचली फेसबुक हेडक्वार्टरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 12:43 IST2017-02-09T07:11:45+5:302017-02-09T12:43:16+5:30

  फेसबुक हे माध्यम प्रत्येकाच्या जिव्हाळयाचा विषय आहे. या विषयापासून लहानांपासून ते मोठयापर्यत क्रेझ निर्माण झाली आहे. काहींना हे माध्यम ...

Tejaswini Pandit reached Facebook headquarters | तेजस्विनी पंडीत पोहोचली फेसबुक हेडक्वार्टरला

तेजस्विनी पंडीत पोहोचली फेसबुक हेडक्वार्टरला

  
फेसबुक हे माध्यम प्रत्येकाच्या जिव्हाळयाचा विषय आहे. या विषयापासून लहानांपासून ते मोठयापर्यत क्रेझ निर्माण झाली आहे. काहींना हे माध्यम एक व्यसन लागले आहे असे म्हणण्यासदेखील हरकत नाही. अशा या माध्यमच्या हेडक्वार्टरला भेट देण्याची इच्छा प्रत्येकाचीच असेल. मात्र सध्या ही इच्छा पूर्ण झाली आहे ती अभिनेत्री तेजस्विनी पंडीतची. त्यामुळे या अभिनेत्रीच्या आनंदाला पारावर उरला नाही. यापूर्वीदेखील चिराग पाटील, सई ताम्हणकर, भूषण पाटील, सायली पकंज, मयूरी वाघ, संजय जाधव अशा अनेक कलाकारांनी या मुंबई येथील फेसबूक हेडक्वार्टरला भेट दिली आहे. 
             
     तेजस्विनी पंडीतने  मुंबई येथील फेसबुक हेडक्वार्टरमध्ये झक्कास फोटोसेशनदेखील केले आहे. त्याचबरोबर तिने हे फोटोसेशन सोशलमीडियावर अपलोड केले आहे. तिच्या या फोटोना सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहे. तिचा या फोटोमधील लूकदेखील एकदमच हटके दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.
         
        या अभिनेत्रीने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. तिने आतापर्यत चित्रपचसृष्टीला एक से एक चित्रपट दिले आहेत. यामध्ये अगं बाई अरेच्चा, गाणं तुमचं आमचं, तू ही रे, पकडा पकडी, लज्जा, मुक्ती, सेव्हन रोशन व्हिला अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ही अभिनेत्री मालिकांच्या माध्यमातूनदेखील आपल्या अभियाची चुणूक दाखविताना दिसत आहे. सध्या तिची हन्ड्रेड ही मालिका लोकप्रिय होताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ती लवकरच एका आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत स्पृहा जोशी, अंकुश चौधरीदेखील झळकणार आहे.या चित्रपटाचे नाव देवा असे असल्याचे समजत आहे. 




         







 

Web Title: Tejaswini Pandit reached Facebook headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.