तेजस्विनीला आवडतात नोझ रिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 19:01 IST2016-08-09T13:31:57+5:302016-08-09T19:01:57+5:30
नेहमीच वेगळ््या भुमिकांसाठी ओळखली जाणारी तेजस्विनी पंडित तिच्या लुक्स मध्ये पण सतत ...
.jpg)
तेजस्विनीला आवडतात नोझ रिंग
वेगळा हेअरकट आणि नाकात नोझरिंग घातलेली तेजस्वीनी फारच सुंदर दिसत आहे. तेजस्वीनी नोझ रिंगसाठी वेडी असून तीचे हे नोझरिंग प्रेम तिने सीएनएक्स सोबत शेअर केले आहे. तेजस्वीनी सांगते, मला लहानपणा पासूनच नाक टोचायला फार अवडायचे पण माझ्या आईने कधीच मला नाक टोचु दिले नाही. मग मी वेगवेगळ््या प्रकारच्या प्रेस रिंग वापरु लागले. मला नाकात नथ घालायलाही फार आवडते. नोझरिंगसाठी तर मी वेडी आहे. कोणत्याही ड्रेसवर आपण नोझरिंग घालू शकतो. मला नाक टोचुन घेता आले नाही म्हणुन मी प्रेस रिंग वापरून माझी ही हौस पुर्ण करून घेते.