रुपेरी पडद्यावर लवकरच वाजणार 'तत्ताड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 08:00 IST2019-02-15T08:00:00+5:302019-02-15T08:00:00+5:30

राहुल गौतम ओव्हाळ लिखित आणि दिग्दर्शित 'तत्ताड' या आगामी चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मीडियाद्वारे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.

'Tattad' marathi movie teaser poster release | रुपेरी पडद्यावर लवकरच वाजणार 'तत्ताड'

रुपेरी पडद्यावर लवकरच वाजणार 'तत्ताड'

सध्या मराठी सिनेसृष्टीत विविध विषय हाताळले जात असून या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. राहुल गौतम ओव्हाळ लिखित आणि दिग्दर्शित 'तत्ताड' या आगामी चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मीडियाद्वारे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. अत्यंत लक्षवेधी पोस्टर असलेल्या या चित्रपटातून एका वादकाची कथा पहायला मिळणार आहे.

चंद्रभागा प्रॉडक्शन्स आणि डीके फिल्म्स एण्टरटेन्मेंटच्या जीवन जाधव, प्रितम म्हेत्रे आणि डीके चेतन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमित माने चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. रोहित नागभिडे, ऐश्वर्य मालगावे यांनी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन, तर संजय नवगिरे, राहुल बेलापूरकर यांनी गीतलेखन केले आहे. 

तत्तड चित्रपटाच्या टीझर पोस्टरमध्ये गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर हाती क्लॅरोनेट असलेला वादक पहायला मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी वादक असण्याची शक्यता आहे. चित्रपटात कलाकार कोण आहे, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. मात्र, लक्षवेधी पोस्टरमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: 'Tattad' marathi movie teaser poster release