स्वप्नील जोशीचा थरकाप उडवणारा हॉरर थ्रिलर 'बळी'; लवकरच येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 17:31 IST2021-12-01T17:30:22+5:302021-12-01T17:31:09+5:30

अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Swapnil Joshi's thrilling horror thriller 'Bali'; See you soon | स्वप्नील जोशीचा थरकाप उडवणारा हॉरर थ्रिलर 'बळी'; लवकरच येणार भेटीला

स्वप्नील जोशीचा थरकाप उडवणारा हॉरर थ्रिलर 'बळी'; लवकरच येणार भेटीला

मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या हॉरर थ्रिलर मराठी चित्रपट बळीची घोषणा केली आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी सोबत पूजा सावंत आणि समर्थ जाधव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. निर्माता विशाल फ्यूरिया यांचे दिग्‍दर्शन आणि अर्जुन सिंग बराण व कार्तिक डी.निशानदार यांच्‍या ग्‍लोबल स्‍पोर्टस् एंटरटेन्‍मेंट अॅण्‍ड मीडिया सोल्‍यूशन्‍स प्रायव्‍हेट लिमिटेडद्वारे निर्मित चित्रपट ‘बळी ९ डिसेंबर रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होण्‍यास सज्‍ज झाला आहे.

‘बळी' चित्रपटात विधुर, मध्‍यमवर्गीय वडिल श्रीकांतच्‍या (स्‍वप्‍नील जोशी) जीवनप्रवासाला दाखवतो. त्‍याचा ७ वर्षाचा मुलगा मंदार (समर्थ जाधव) चक्‍कर येऊन पडतो आणि सविस्‍तर निदानासाठी त्‍याला जनसंजीवन हॉस्पिटलमध्‍ये नेते जाते. येथून श्रीकांतच्‍या जीवनाला अनपेक्षित कलाटणी मिळते. स्थितीला रोमांचक वळण मिळते जेव्‍हा मंदार एका रहस्‍यमय परिचारिकेसोबत बोलायला सुरूवात करतो. तो ती परिचारिका हॉस्पिटलच्‍या पडक्‍या भागामध्‍ये राहत असल्‍याचा दावा करतो.  


दिग्‍दर्शक विशाल फ्युरिया म्‍हणाले, हॉरर या शैलीने माझे लक्ष वेधून घेतले आहे आणि या शैलीमधील प्रत्‍येक चित्रपटासह काहीतरी नवीन घेऊन येण्‍याचा माझा सातत्‍याने प्रयत्‍न राहिला आहे. या चित्रपटामधील सर्व पात्रांमधील भावना, भय लक्षवेधक आहेत. मी माझ्यावर आणि माझ्या कामावर विश्‍वास ठेवण्‍यासाठी निर्माते अर्जुन व कार्तिक यांचे आभार मानतो. 

Web Title: Swapnil Joshi's thrilling horror thriller 'Bali'; See you soon