स्वप्नील जोशीनं लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली स्पेशल पोस्ट, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 13:23 IST2022-12-16T13:22:58+5:302022-12-16T13:23:14+5:30

Swapnil Joshi : आज स्वप्नील जोशीच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्याने सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

Swapnil Joshi shared a special post on the occasion of his wedding anniversary, saying... | स्वप्नील जोशीनं लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली स्पेशल पोस्ट, म्हणाला...

स्वप्नील जोशीनं लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली स्पेशल पोस्ट, म्हणाला...

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi)ने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. स्वप्निल जोशी एक अभिनेता म्हणून नावारुपाला येत असताना त्याच्या जीवनात अनेक चढ उतार आले. पण एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. ही व्यक्ती म्हणजे त्याची पत्नी लीना जोशी. आज स्वप्नील जोशीच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्याने सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

स्वप्नील जोशीने इंस्टाग्रामवर पत्नीसोबतचे कॅमेऱ्यात कैद केलेले सुंदर क्षणांचा व्हिडीओ शेअर करून लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, स्मितहास्यासाठी आभारी आहे. मला कुटंब दिल्याबद्दल आभारी आहे. अविस्मरणीय आठवणींसाठी आभारी आहे. वेडेपणासाठी आभारी आहे. विचित्रपणासाठी धन्यवाद. छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी आभारी आहे. देव तुला आशीर्वाद देवो. लव्ह यू मम्मा. ओ हा...लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

स्वप्निल जोशीची पत्नी लीना ही डेन्टिस्ट असून २०११ साली लीना आणि स्वप्निल यांनी लग्न केले. त्या दोघांना मायरा आणि राघव अशी दोन मुले आहेत. स्वप्नील बऱ्याचदा मुलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

स्वप्नील जोशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या तो छोट्या पडद्यावरील तू तेव्हा तशी मालिकेत पाहायला मिळतो आहे. या मालिकेत त्याने साकारलेला सौरभ प्रेक्षकांना खूप भावला आहे. मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.
 

Web Title: Swapnil Joshi shared a special post on the occasion of his wedding anniversary, saying...