"नाकातून रक्त कसं काढतोस?", स्वप्निल जोशीला चाहत्याचा थेट प्रश्न, अभिनेता म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 15:13 IST2026-01-07T15:10:36+5:302026-01-07T15:13:20+5:30
'दुनियादारी'मध्ये स्वप्निलने साकारलेल्या श्रेयसला कॅन्सर झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे त्याच्या नाकातून सतत रक्त येत असतं. सिनेमातील त्याच्या नाकातून रक्त येण्याचा सीन प्रचंड व्हायरल झाला होता. याबाबतच एकाने त्याला प्रश्न विचारला.

"नाकातून रक्त कसं काढतोस?", स्वप्निल जोशीला चाहत्याचा थेट प्रश्न, अभिनेता म्हणाला...
स्वप्निल जोशी हा मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय नट आहे. 'मुंबई पुणे मुंबई', 'मितवा', 'दुनियादारी', 'वाळवी', 'मंगलाष्टक वन्स मोअर', 'प्यार वाली लव्ह स्टोरी', 'नवरा माझा नवसाचा २' हे त्याचे गाजलेले सिनेमे. 'दुनियादारी' सिनेमातील स्वप्निलची भूमिका प्रचंड गाजली. या सिनेमातील त्याचे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या ओठांवर असतात. 'दुनियादारी'मध्ये स्वप्निलने साकारलेल्या श्रेयसच्या भूमिकेचे अनेक मीम्सही व्हायरल होत असतात.
'दुनियादारी'मध्ये स्वप्निलने साकारलेल्या श्रेयसला कॅन्सर झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे त्याच्या नाकातून सतत रक्त येत असतं. सिनेमातील त्याच्या नाकातून रक्त येण्याचा सीन प्रचंड व्हायरल झाला होता. त्याच्यावर अनेक मीम्सही बनवले गेले. नुकतंच स्वप्निलने अमृता खानविलकरसह कॉलेजमधील एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये स्वप्निलच्या एका विद्यार्थी चाहत्याने त्याला "नाकातून रक्त कसं काढतोस?", असा मजेशीर प्रश्न विचारला. स्वप्निलने या प्रश्नाचं उत्तर देताना गमतीत म्हटलं की "नाकातून रक्त मी काढत नाही तर माझे निर्माते काढतात".

२०१३ मध्ये 'दुनियादारी' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. संजय जाधव यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. 'दुनियादारी'मध्ये अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, उर्मिला कोठारे, रिचा परियाली, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, योगेश शिरसाट, प्रणव रावराणे अशी तगडी स्टारकास्ट होती. 'दुनियादारी' हा मराठीतील एव्हरग्रीन सिनेमा मानला जातो.