स्वप्नील जोशीला लागले ह्या गोष्टीचे वेड, दिवसरात्र घेतोय ह्या व्यक्तीचे सल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 15:31 IST2019-02-06T15:14:27+5:302019-02-06T15:31:41+5:30

अभिनेता स्वप्नील जोशी देखील सध्या फिटनेस फ्रिक झाला असून कदाचित स्वप्निलच्या चाहत्यांना सिक्स पॅक अॅब्स लूक पाहायला मिळू शकतो.

Swapnil Joshi, crazy for this thing, the advice of this person taking night and day | स्वप्नील जोशीला लागले ह्या गोष्टीचे वेड, दिवसरात्र घेतोय ह्या व्यक्तीचे सल्ले

स्वप्नील जोशीला लागले ह्या गोष्टीचे वेड, दिवसरात्र घेतोय ह्या व्यक्तीचे सल्ले

ठळक मुद्देस्वप्नील घेतोय शरीरयष्टीवर मेहनतनुकताच स्वप्नीलचा ‘मी पण सचिन’ चित्रपट झाला प्रदर्शित


सध्या सगळेच कलाकार फिटनेस फ्रिक झाले आहेत. त्यामुळे फिट राहण्यासाठी कोणी योगा करतंय तर कोणी जिम वा डाएट..अभिनेता स्वप्नील जोशी देखील सध्या फिटनेस फ्रिक झाला असून कदाचित स्वप्निलच्या चाहत्यांना सिक्स पॅक अॅब्स लूक पाहायला मिळू शकतो. स्वप्नीलचा नुकताच मी पण सचिन चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात स्वप्नीलने क्रिकेटरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतूक होत आहे. 

मी पण सचिन’ चित्रपटातील स्वप्नीलचे व्यक्तीमत्त्व पाहून स्वप्नील फिटनेस फ्रिक झाल्याचे समजते आहे. त्याच्यात हा बदल घडवण्यामागे एका व्यक्तीचा हात आहे. ती व्यक्ती म्हणजे बॉलिवूडमधील प्रख्यात आणि लोकप्रिय शल्यक्रियातज्ञ डॉ. मुफ्फझल लकडावाला.

स्वप्नील गेले काही महिने डॉ. मुफ्फझल यांच्या वैयक्तिक देखरेखीखाली त्यांच्याच केंद्रात, शास्त्रीय पद्धतीने वजनावर मेहनत घेतो आहे. त्याचा आहार ते फिटनेस व्यायामापर्यंत, सगळ्याच बाबतीत नियमित रुपाने देखरेख केली जात आहे. असेही म्हटले जाते की डॉ. मुफ्फी स्वप्नीलला आगामी चित्रपटासाठी ही प्रशिक्षण देत आहेत आणि कदाचित तो त्याच्या चाहत्यांना त्याचे सिक्स पॅक अॅब्स लुकमध्ये पाहायला मिळू शकतो. आता स्वप्नील कोणत्या चित्रपटासाठी शरीरयष्टीवर मेहनत घेतो आहे, हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.

इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट एण्टरटेन्मेंट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित 'मी पण सचिन' चित्रपट १ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. नीता जाधव आणि गणेश गीते या चित्रपटाचे निर्माते असून श्रेयश जाधव यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

Web Title: Swapnil Joshi, crazy for this thing, the advice of this person taking night and day