नारी का saree swag !,तेजस्विनी पंडितच्या साडीतल्या फोटोवर स्वप्नील जोशी म्हणाला क..ड..क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 07:00 IST2021-02-19T07:00:00+5:302021-02-19T07:00:02+5:30

Tejaswini Pandit share satylish photo in saree : सोशल मीडियावर तेजस्विनी हा फोटो व्हायरल होतो आहे.

Swapnil joshi commended on tejaswini pandit saree photo | नारी का saree swag !,तेजस्विनी पंडितच्या साडीतल्या फोटोवर स्वप्नील जोशी म्हणाला क..ड..क

नारी का saree swag !,तेजस्विनी पंडितच्या साडीतल्या फोटोवर स्वप्नील जोशी म्हणाला क..ड..क

अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. इन्स्टाग्रामवर तिचे फोटो, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्टची माहिती ती चाहत्यांना देत असते. तेजस्विनीने साडीतला एका स्टायलिश फोटो पोस्ट केला आहे. यात तेजस्विनीचा स्वॅग लूक दिसतोय. साडीतसोबत तिने मॅचिंग गॉगल घातला आहे. नारी का saree swag !!! असे हटके कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. चाहत्यांना सह सेलिब्रेटींनी ही तिच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत सिद्धार्थ जाधवने सुपर किलर तर स्वप्निल जोशीने कडक अशी कमेंट तिच्या फोटोवर केली आहे. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होतो आहे. 


मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.लवकरच तेजस्विनी 'समातंर 'च्या दुसऱ्या सीझनमध्ये झळकणार आहे.


तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजश्रीने काही वर्षांपूर्वी ‘अगं बाई अरेच्चा’ या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली होती.

Web Title: Swapnil joshi commended on tejaswini pandit saree photo