हा आहे मराठीतील प्रसिद्ध अभिनेता, ओळखा पाहू कोण आहे हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 17:30 IST2019-04-27T17:12:49+5:302019-04-27T17:30:17+5:30

या फोटोतील हे बाळ कुर्ता, पायझमा अशा भारतीय पेहरावात दिसत असून ते एका खुर्चीत बसलेले आहे. 

Swapnil Joshi childhood picture | हा आहे मराठीतील प्रसिद्ध अभिनेता, ओळखा पाहू कोण आहे हा?

हा आहे मराठीतील प्रसिद्ध अभिनेता, ओळखा पाहू कोण आहे हा?

ठळक मुद्देया फोटोतील हे बाळ राघव अथवा मायरा नसल्याचे स्वप्निलच्या फॅन्सचे म्हणणे असून हा फोटो तुझाच आहे असे त्याचे चाहते त्याला प्रतिक्रियांद्वारे सांगत आहेत. एवढेच नव्हे तर तू लहानपणी देखील खूपच छान दिसायचास असे देखील ते सांगत आहेत. 

आपल्या आवडत्या कलाकारांचे बालपणाचे फोटो पाहायला प्रेक्षकांना नेहमीच आवडतात. त्यामुळे कलाकार देखील आपल्या लाडक्या चाहत्यांसाठी त्यांचे लहानपणीचे फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर करत असतात. प्रेक्षकांचा लाडका अभिनेता स्वप्निल जोशीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका क्यूट बेबीचा फोटो नुकताच पोस्ट केला आहे. या फोटोत हे बाळ कुर्ता, पायझमा अशा भारतीय पेहरावात दिसत असून ते एका खुर्चीत बसलेले आहे. 

स्वप्निलने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा फोटो कोणाचा आहे हे स्वप्निलने त्याच्या चाहत्यांना सांगितलेले नाहीये. हे गोंडस बाळ कोण आहे हे ओळखण्याची स्वप्निलने त्याच्या चाहत्यांना संधी दिली आहे. स्वप्निलने या फोटोसोबत कॅप्शन लिहून हे बाळ कोण आहे हे तुम्हीच ओळखा असे त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे. त्यासोबतच हा फोटो कोणाचा आहे हे ओळखण्यासाठी त्याने त्याच्या चाहत्यांना तीन पर्याय देखील दिले आहेत. त्याने पर्यायात त्याचे, त्याची मुलगी मायरा आणि मुलगा राघवचे नाव लिहिले आहे. पण या फोटोतील हे बाळ राघव अथवा मायरा नसल्याचे स्वप्निलच्या फॅन्सचे म्हणणे असून हा फोटो तुझाच आहे असे त्याचे चाहते त्याला प्रतिक्रियांद्वारे सांगत आहेत. एवढेच नव्हे तर तू लहानपणी देखील खूपच छान दिसायचास असे देखील ते सांगत आहेत.

स्वप्निलने आपल्या हटके अभिनय शैलीने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळेच प्रेक्षक त्याला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणून संबोधतात. स्वप्निलने ‘उत्तर रामायण’ या मालिकेतून वयाच्या नवव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘कृष्णा’ या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले.

पुढे त्याने ‘हद कर दी आपने’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘देस में निकला होगा चाँद’, ‘अमानत’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचे तर सर्वत्र कौतुक झाले होते. ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्रमात स्वप्निलचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना बघावयास मिळाला. सध्या जिवलगा या मालिकेत तो मुख्य भूमिका साकारत आहे. 

Web Title: Swapnil Joshi childhood picture