फोटोत दिसणा-या चिमुरड्याला आपण ओळखले का? आज आहे मराठी चित्रपटांचा सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 10:51 IST2019-10-04T10:48:30+5:302019-10-04T10:51:27+5:30

तो सोशल मीडियावरही सक्रीय असतो. या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी संवाद साधतो.

Swapnil Joshi Childhood Photo Viral | फोटोत दिसणा-या चिमुरड्याला आपण ओळखले का? आज आहे मराठी चित्रपटांचा सुपरस्टार

फोटोत दिसणा-या चिमुरड्याला आपण ओळखले का? आज आहे मराठी चित्रपटांचा सुपरस्टार


सोशल मीडियामुळे आपल्या लाडक्या कलाकाराची माहिती आणि त्यांचे कधीही न पाहिलेले फोटो तसंच व्हिडिओ पाहायला मिळतं. नुकतंच सोशल मीडियावर एका लहान मुलाचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो आहे आजच्या तरुणाईचा लाडका  आणि चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी याचा. आपल्या लाडक्या अभिनेत्याचा बालपणाचा फोटो पाहून त्याचे फॅन्सही खूश झालेत. चेहऱ्यावर अलगद हास्य असलेला स्वप्निलचा हा फोटो फॅन्सच्या पसंतीस पात्र ठरत आहे. विशेष म्हणजे या फोटोत स्वप्निल आपल्या आईबरोबर आहे. या फोटोत स्वप्निल खूपच क्यूट दिसत असल्याचे त्याच्या फॅन्सचे म्हणणे आहे. स्वप्निलने ‘उत्तर रामायण’ या मालिकेतून वयाच्या नवव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘कृष्णा’ या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले.


आपल्या विविधरंगी भूमिका आणि अनोख्या स्टाईलनं स्वप्नीलनं तरुणाच्या मनात अढळ स्थान मिळवलंय. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरही स्वप्नीलनं आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'चेकमेट', 'दुनियादारी', 'मुंबई-पुणे-मुंबई', 'मितवा', 'मोगरा फुलला' अशा विविध चित्रपटांमधून स्वप्नीलने आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. स्वप्नील सोशल मीडियावरही सक्रीय असतो. या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी संवाद साधतो. 

स्वप्निलला मायरा आणि राघव हे दोन मुले आहेत. स्वप्निल आणि लीना १६ डिसेंबर २०११ ला विवाहबंधनात अडकले.   ज्युनियर स्वप्नील म्हणजेच त्याचा छोटा मुलगा राघव स्वप्नीलच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री केली आहे. तो जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या जाहिरातीत झळकत आहे. ही जाहिरात ५ सप्टेंबरपासून छोट्या पडद्यावर झळकत आहे.

Web Title: Swapnil Joshi Childhood Photo Viral