सावनी घेऊन येतेय स्वत:चे अ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 17:36 IST2016-11-22T13:34:23+5:302016-11-22T17:36:28+5:30

  priyanka londhe                 गायिका सावनी रवींद्रने अनेक मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. ...

Swanni is bringing its own app | सावनी घेऊन येतेय स्वत:चे अ‍ॅप

सावनी घेऊन येतेय स्वत:चे अ‍ॅप

  <
em>priyanka londhe
       
        गायिका सावनी रवींद्रने अनेक मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. सावनीने तिच्या सदाबहार अवाजाने रसिक प्रेक्षकांना देखील नेहमीच मंत्रमुग्ध केले आहे. आता सावनी तिच्या चाहत्यांसाठी एक सरप्राईज घेऊन येत आहे. तुम्हाला वाटेल कि सावनीचा नवीन अल्बव येणार आहे का? कि सावनी आता आपल्याला अभिनय करताना दिसणार ? असे अनेक प्रश्न नक्कीच सावनीच्या चाहत्यांना पडले असणार. परंतु सावनी तिच्या नावाचे अ‍ॅप लवकरच घेऊन येणार आहे. सावनी रवींद्र या नावाचे एक अ‍ॅप आता लाँच होणार आहे. अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलवर हे अ‍ॅप अगदी मोफत सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. या अ‍ॅप संदर्भात सावनीने सर्वात आधी लोकमत सीएनएक्सला माहिती दिली. सावनी सांगते, या अ‍ॅपमध्ये प्रेक्षकांना माझी सर्व प्रकारची गाणी ऐकायला मिळणार आहेत. माझे अनेक अल्बम्स, चित्रपटातील गाणी बºयाचदा प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत. मग अशावेळी अ‍ॅपच्या माध्यमातून त्यांना माझ्याविषयी सर्वच माहिती अगदी सहजपणे आता उपलब्ध होऊ शकते. मोबाईल आता जवळपास सगळ््यांकडेच असतात. त्यामुळे एका क्लिकवर माझे सर्वच अपडेट्स नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मला माझ्या चाहत्यांच्या संपर्कात देखील राहता येणार आहे. प्रशांत रेडकर या माझ्या फॅनने हे अ‍ॅप तयार केले आहे. यासाठी तो जवळपास दोन महिन्यांपासुन काम करत होता. आता अ‍ॅप तयार झाले आहे. मराठी, हिंदी आणि  इंग्रजी अशा  तीन भाषांमध्ये माहिती या अ‍ॅपमध्ये प्रेक्षकांना मिळणार आहे. एवढेच नाही तर माझे काही फोटो देखील यामध्ये असणार आहेत. मला फोटोग्राफी करण्याची जाम आवड आहे. त्यामुळे मी बरेच फोटो काढले आहेत. मी क्लिक केलेले काही फोटोज देखील अ‍ॅपवर अपलोड करण्यात आले आहेत. सावनीचे चाहते नक्कीच या अ‍ॅपच्या प्रतिक्षेत असणार यात मात्र काही शंकाच नाही.

Web Title: Swanni is bringing its own app