मराठीतील ही स्टारकिड इंडस्ट्रिमध्ये येण्याआधीच ठरतेय हिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 16:54 IST2019-12-03T16:41:36+5:302019-12-03T16:54:54+5:30

ती अवघी 4 वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले.

Swanandi berde share her new photoshoot on social media | मराठीतील ही स्टारकिड इंडस्ट्रिमध्ये येण्याआधीच ठरतेय हिट

मराठीतील ही स्टारकिड इंडस्ट्रिमध्ये येण्याआधीच ठरतेय हिट

स्वानंदी बेर्डे  सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटचे आणि इतरही काही फोटो ती शेअर करत असते. स्वानंदीने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केले आहे. यात  निळ्या रंगाच्या स्कर्ट-टॉपमध्ये स्वानंदी खूपच सुंदर दिसते आहे. या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहावयास मिळतो आहे. हा फोटो पाहून अनेक लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव तिच्या फोटोवर होत आहे. 


सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी बॉलिवूडमधील स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत.

आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं मुलीसुद्धा अभिनय क्षेत्रात एंट्री मारणं ही काही नवी बाब राहिली नाही. असेच काही मराठी चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळते आहे. यात मराठीतील स्टार किडच्या यादीत लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डेचे नाव आघाडीवर आहे.


स्वानंदी बेर्डेने 'रिस्पेक्ट' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. किशोर बेळेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. 

Web Title: Swanandi berde share her new photoshoot on social media