साडीत खूपच सुंदर दिसते स्वानंदी बेर्डे, पाहा तिचा मराठमोळा श्रृंगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 07:00 IST2020-11-03T07:00:00+5:302020-11-03T07:00:07+5:30

स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.

Swanandi Berde looks very beautiful in a saree | साडीत खूपच सुंदर दिसते स्वानंदी बेर्डे, पाहा तिचा मराठमोळा श्रृंगार

साडीत खूपच सुंदर दिसते स्वानंदी बेर्डे, पाहा तिचा मराठमोळा श्रृंगार

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटचे आणि इतरही काही फोटो ती शेअर करत असते. बऱ्याचदा ती फोटोंमुळे चर्चेत येत असते. अलीकडचे तिने इन्स्टाग्रामवर साडीतले फोटो शेअर केले आहेत. या फोटोला स्वानंदीने कॅप्शनच्या जागी एक हार्टची इमोजी शेअर केली आहे. साडीतल्या फोटो स्वानंदी खूपच सुंदर दिसते आहे. स्वानंदीचा साडीतले लूक तिच्या चाहत्यांनासुद्धा आवडला आहे. त्यांनी लाईक्सच्या माध्यमातून फोटोला पसंती दर्शवली आहे.


आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं मुलीसुद्धा अभिनय क्षेत्रात एंट्री मारणं ही काही नवी बाब राहिली नाही. असेच काही मराठी चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळते आहे. यात मराठीतील स्टार किडच्या यादीत लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डेचे नाव आघाडीवर आहे.

स्वानंदी बेर्डेने 'रिस्पेक्ट' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.यात मराठीतील स्टार किडच्या यादीत लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डेचे नाव आघाडीवर आहे. स्वानंदी बेर्डेने 'रिस्पेक्ट' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.

Web Title: Swanandi Berde looks very beautiful in a saree