स्वानंदी बनली खतरों के खिलाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 14:20 IST2016-05-10T08:47:47+5:302016-05-10T14:20:26+5:30

खतरो के खिलाडी नुकतेच संपले आहे.  तरी  आपली मिनू म्हणजेच स्वानंदी टिकेकर दिल दोस्ती दुनियानंतर असा कोणता खतरो के ...

Swainandi became a threat player | स्वानंदी बनली खतरों के खिलाडी

स्वानंदी बनली खतरों के खिलाडी

रो के खिलाडी नुकतेच संपले आहे.  तरी  आपली मिनू म्हणजेच स्वानंदी टिकेकर दिल दोस्ती दुनियानंतर असा कोणता खतरो के खिलाडी शो करते या विचारात तुम्ही नक्कीच पडला असेल? तर गोंधळून जाऊ नका. ती कोणताही असा रियालिटी शो वगैरे करत नाही. ती नुकतीच, एका नाटकाच्या प्रयोगासाठी सिंगापूरला गेली होती. त्याठिकाणी साइटिंगला गेली असता तिथे खूप सारे साप ठेवले होते. त्यावेळी तेथील एक माणूस तिला म्हणाला, तुम्ही या सापाला हात लावू शकता. हे ऐकताच पहिल्यांदा मी खूप घाबरले. पण तो बोलला, खूप सॉफ्ट आहे हा साप, चावणार ही नाही. म्हणून धाडस करून विचार केला की, आज परदेशात आले आहे, वाट्टेल ते होऊ दे घाबरायचं नाही. आज या सापाला गळयात घ्यायचाचं. विषयच संपला म्हणत, त्याला मोठया हिंमतीने गळयात घेतला व असे सुंदर फोटोसेशन केले. तिच्या या डॅशिंग अंदाजात तिने आपला हा अनुभव लोकमत सीएक्सशी शेअर केला. असो, स्वानंदीच्या   या  स्टंटमुळे तिचा हा डॅशिंगबाजपणा खरचं तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरेल हे नक्की.

Web Title: Swainandi became a threat player