सुयोग गोऱ्हे व मिताली मयेकर पहिल्यांदाच झळकणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 19:17 IST2018-12-03T19:16:41+5:302018-12-03T19:17:21+5:30

सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर या कलाकरांची केमिस्ट्री 'आम्ही बेफिकर' या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे.

Suyog Gorhe and Mitali Mayekar Work together | सुयोग गोऱ्हे व मिताली मयेकर पहिल्यांदाच झळकणार एकत्र

सुयोग गोऱ्हे व मिताली मयेकर पहिल्यांदाच झळकणार एकत्र

ठळक मुद्देसुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकरची केमिस्ट्री ‘आम्ही बेफिकर’ चित्रपटात

मराठी सिनेमांमधून नवनवीन जोड्या रुपेरी पडद्यावर पाहायला मिळत आहेत. त्यातील काही जोड्या रसिकांना खूप भावत आहेत. नव्या दमाच्या कलाकारांमधली अशीच एक नवी आणि फ्रेश जोडी आता लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर या युवा कलाकरांची केमिस्ट्री ‘आम्ही बेफिकर’ या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे.

हरिहर फिल्म्सच्या नागेश मिश्रा, अंतरिक्ष चौधरी, कविश्वर मराठे आणि रोहित चव्हाण यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे तर रोहित पाटील हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. आम्ही बेफिकर सिनेमाचे दिग्दर्शन कविश्वर मराठे यांनी केले आहे. खूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या आशयसूत्रावर हा सिनेमा बेतला आहे. आजच्या तरुणांशी संवाद साधण्याचा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे.


सुयोग आणि मिताली यांनी मालिका व चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. ‘आम्ही बेफिकर’ या सिनेमाच्या निमित्ताने ते दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. नव्या दमाचे कलाकार आणि नव्या पिढीचा विषय मांडणारा हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल. सर्वांनाच या सिनेमाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.
 

Web Title: Suyog Gorhe and Mitali Mayekar Work together