सुयशने केली गणेशमुर्ती दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 16:28 IST2016-09-17T10:58:44+5:302016-09-17T16:28:44+5:30

           गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी दरवर्षीच गाजत वाजत, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूका निघल्याचे आपण पाहतो. ब-याचदा सामाजिक ...

Suyeshne Kale Ganesh Murthy donation | सुयशने केली गणेशमुर्ती दान

सुयशने केली गणेशमुर्ती दान

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> 
         गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी दरवर्षीच गाजत वाजत, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूका निघल्याचे आपण पाहतो. ब-याचदा सामाजिक आणि पर्यावरणाची काळजी करणारे लोक गणेशोत्सवात प्लॅस्टर आॅफ पॅरिसची मुर्ती न वापरता शाडूची मुर्ती आणतात. परंतू अभिनेता सुयश टिळकने यापुढे एक पाऊल टाकत पर्यावरणाची हानी होवू नये यासाठी चक्क गणेश मुर्तीचे विसर्जनच केले नाही. त्याचबरोबर सुयशने त्याच्या घरच्या बाप्पाचे विसर्जन न करता गणेश मुर्तीचे दान केले आहे. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आणि संकल्पनेचे सुयशचे चाहते त्याचे कौतुक करतायेत. सुयश नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचे वेळोवळी दिसून आले आहे. बाप्पाच्या मुर्तीचे दान करून एक नवीन पायंडा त्याने रचलाय. याबद्दल सुयश सांगतो, ''मुर्तीदान जलसृष्टीला जीवनदान'' या ब्रीदवाक्यानुसार  गणेश विसर्जनाला एक चांगला पर्याय मिळाला आहे. कलाकारांना नेहमीच फॉलो करणारे त्यांचे चाहते आता अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांनाही नक्कीच हातभार लावतील अशी आशा करायला काहीच हरकत नाही.

Web Title: Suyeshne Kale Ganesh Murthy donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.