सुयश टिळकचा न्यु व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 16:16 IST2016-08-19T10:46:56+5:302016-08-19T16:16:56+5:30

Exculsive - बेनझीर जमादार                  बॉलिवुडमध्ये धीरे धारे से मेरे जिंदगी आना, ...

Suyash Tilak's new video | सुयश टिळकचा न्यु व्हिडीओ

सुयश टिळकचा न्यु व्हिडीओ

ong>Exculsive - बेनझीर जमादार
                
बॉलिवुडमध्ये धीरे धारे से मेरे जिंदगी आना, मैं रहू या ना रहू असे एक से एक व्हिडीओ साँग हिट झाले आहेत. बॉलीवुडमधील या सोलो साँग व्हिडीओची क्रेझ आता मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सुयश टिळक हा देखील लवकरच एका व्हिडीओमध्ये झळकणार आहे. अजून ही मला स्मरतोस....असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याला कमलेश भडकमकर यांनी संगीत दिले आहे. तर हे गाणं किर्ती किल्लेदार हिच्या आवाजात रसिकांपर्यत पोहचणार आहे. या व्हिडीओबद्दल लोकमत सीएनएक्सशी बोलताना सुयश म्हणाला, व्हिडीओचा हा ट्रेंड मला खरचं खूप आवडतो. कारण बरेच संगीतकार आहेत. ज्यांनी आपले गाणे लिहून ठेवले आहेत. पण त्यांची ही गाणी रसिकांपर्यत पोहोचलली नसतात. पण व्हिडीओच्या या नव्या ट्रेंडमुळे या संगीतकारांच्या गाण्यांना व्हिडीओच्या माध्यमातून व्यासपीठ मिळत आहे. याचा आनंद होतो. त्याचबरोबर हे व्हिडीओ गाणी बघायला व ऐकायला देखील खूप छान वाटतात. तसेच यापूर्वीचा माझा या सांज किनाºयापाशी असणारा जो व्हिडीओ आहे. त्याच पद्धतीचा हा देखील व्हिडीओ असणार आहे. हा व्हिडीओ लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

Web Title: Suyash Tilak's new video