Engaged: अभिनेता सुयश टिळकचे होणार दोनाचे चार हात, झाला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 09:29 IST2021-07-07T09:28:38+5:302021-07-07T09:29:53+5:30

सुयश टिळकचे फोटो पाहताच चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.  

Suyash Tilak gets engaged with Aayushi Bhave | Engaged: अभिनेता सुयश टिळकचे होणार दोनाचे चार हात, झाला साखरपुडा

Engaged: अभिनेता सुयश टिळकचे होणार दोनाचे चार हात, झाला साखरपुडा

अभिनेता सुयश टिळकचा साखरपुडा झाला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. आयुषी भावेसह त्याचा साखरपुडा झाला आहे.इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास कॅप्शन देत  साखरपुडा सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे आज आयुषीच्या वाढदिवस आहे.वाढदिवसाच्याच दिवशी सुयशने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सुयश टिळकचे फोटो पाहताच चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. साखरपुडा झाला असला तरी सनई चौघडे कधी वाजणार अर्थात त्यांच्या लग्नाची तारीख काय हे अद्याप समोर आलेले नाही.


दोघांचे फोटो खास असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघांचा हा रोमँटिक अंदाज घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.फोटो पाहिल्यानंतर सुयश टिळकची जोडीदार आयुषी भावे नेमकी कोण आहे? याविषयी चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. आयुषी भावेसुद्धा अभिनेत्री आणि  डान्सर आहे. युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी झळकली होती. आयुषी लवकरच या गावाचं की त्या गावाचं सिनेमात झळकणार आहे. 

आयुषी इन्स्टाग्रामच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यास विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.

Web Title: Suyash Tilak gets engaged with Aayushi Bhave