'सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नाही तर त्याला मारलंय"; उषा नाडकर्णींचं मोठं विधान, म्हणाल्या-
By देवेंद्र जाधव | Updated: May 22, 2025 13:42 IST2025-05-22T13:40:41+5:302025-05-22T13:42:27+5:30
उषा नाडकर्णींनी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येबद्दल मोठा खुलासा केला आहे. याशिवाय त्याला मारलंय, असा गंभीर आरोपही केला आहे. काय म्हणाल्या?

'सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नाही तर त्याला मारलंय"; उषा नाडकर्णींचं मोठं विधान, म्हणाल्या-
ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (usha nadkarni) या कायमच त्यांच्या रोखठोक आणि बिनधास्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. उषा नाडकर्णी कोणालाही न घाबरता त्यांच्या प्रतिक्रिया देत असतात. उषा नाडकर्णी आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचं चांगलं नातं होतं. 'पवित्र रिश्ता' मालिकेत उषा यांनी सुशांतच्या आईची भूमिका साकारली होती. सुशांतने आत्महत्या केली त्या घटनेवर लोकमत फिल्मीशी बोलताना उषा यांनी स्पष्ट वक्तव्य केलंय. काय म्हणाल्या?
सुशांतने आत्महत्या केली नाही तर त्याला मारलं
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी म्हणाल्या की, "सुशांतशी जेव्हा पहिली ओळख झाली तेव्हा मी बघितलं की छान पोरगा आहे. बोलायला वगैरे खूप छान होता. नंतर त्याला वेगळ्या लोकांची साथ मिळाल्याने तो थोडा वेगळा झाला. पण वेगळा म्हणजे तसा वेगळा नाही तर नेहमीच्या वागण्यातला वेगळा झाला. पण तो पोरगा खरंच गोड होता. त्याची वाट लावली या सगळ्या लोकांनी."
"मी नेहमी सांगते की, त्याने गळफास घेतला नाहीय तर त्याला मारलंंय. परवा मी फेसबुकवर बघत होती, तेव्हा एकटाच सांगतो आणि असं चित्र दिसंत की, एक मुलगी आली आहे. त्यानंतर सावन नावाचा एक माणूस गेला आणि तो वरुन बॅग घेऊन आला. ती बॅग त्याने त्या मुलीच्या हातात दिली. त्याच्यात मारताना जे वापरलं ते सगळं दिसतंय. ज वरुन काहीतरी त्या मुलीचं नाव आहे. त्याच्या गळ्याला बेल्ट जो आवळला होता तो पण होता."
"मी नेहमी सांगते त्याने हँग करुन घेतलं नाही तर त्याला मारलं. मी तुम्हाला म्हटलं ना देव आहे. ज्यांनी सुशांतला मारलं त्यांनाही देव शिक्षा देणारच आहे. मला पाहिजे तर गोळ्या घालू देत पण जे आहे ते मी बोलतेय." अशा शब्दात उषा नाडकर्णींनी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येबद्दल त्यांचं मत व्यक्त केलंय. उषा नाडकर्णी नुकत्याच आपल्याला 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' या रिअॅलिटी शोमध्ये दिसल्या होत्या.