"जहांगीर मांडलेकर तुला.."; चिन्मय मांडलेकरच्या लेकासाठी सुप्रिया पिळगावकर मोजकंच अन् महत्वाचं बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 11:38 IST2024-04-24T11:38:12+5:302024-04-24T11:38:30+5:30

अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी चिन्मय मांडलेकर यांचा लेक जहांगीर साठी मोजक्या शब्दात खास पोस्ट लिहिली आहे (chinmay mandlekar, supriya pilgaonkar)

supriya pilgaonkar post for chinmay mandlekar son jahangir controversy | "जहांगीर मांडलेकर तुला.."; चिन्मय मांडलेकरच्या लेकासाठी सुप्रिया पिळगावकर मोजकंच अन् महत्वाचं बोलल्या

"जहांगीर मांडलेकर तुला.."; चिन्मय मांडलेकरच्या लेकासाठी सुप्रिया पिळगावकर मोजकंच अन् महत्वाचं बोलल्या

गेल्या काही दिवसांपासून चिन्मय मांडलेकर आणि त्याच्या मुलाच्या नावाची खूप चर्चा आहे. मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने चिन्मय मांडलेकर आणि त्याची पत्नी नेहाला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. यामुळे चिन्मयने ट्रोलिंगला वैतागून पुन्हा छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नाही असा निर्णय घेतला. या प्रकरणावर मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार चिन्मयला पाठिंबा देताना दिसत आहेत. 

अशातच अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी सोशल मीडियावर मोजक्या शब्दात त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुप्रिया लिहितात, "जहांगीर मांडलेकर तुला अनेकानेक शुभ आशिर्वाद", अशा मोजक्या शब्दात सुप्रिया यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अशाप्रकारे सुप्रिया पिळगावकर यांनी चिन्मय मांडलेकर प्रकरणावर मौन सोडलंय. याशिवाय चिन्मयचा लेक जहांगीरला आशिर्वाद दिले आहेत.

चिन्मय मांडलेकरचं प्रकरण नेमकं काय?

चिन्मय मांडलेकर प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. झालं असं की... एका पॉडकास्टमध्ये चिन्मयने मुलाचं नाव जहांगीर ठेवलंय याचा खुलासा केला. त्यावरुन सोशल मीडियावर चिन्मयला खूप ट्रोल करण्यात आलं. त्याची पत्नी नेहाच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या प्रतिक्रियाही समोर आल्या. याशिवाय चिन्मयने शिवरायांची भूमिका साकारली असूनही मुलाचं नाव जहांगीर ठेवलं, यामुळे लोकांनी त्याच्यावर नाराजी दर्शवली. अखेर चिन्मयने व्हिडीओ शेअर करत पुन्हा महाराजांची भूमिका साकारणार नाही असा निर्णय घेतला.

Web Title: supriya pilgaonkar post for chinmay mandlekar son jahangir controversy