सुमेध-संस्कृतीच्या 'बेखबर कशी तू'ला मिळतोय उत्तम प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 06:30 IST2018-11-20T06:30:00+5:302018-11-20T06:30:00+5:30

चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम 'बेखबर कशी तू' नुकताच प्रदर्शित झाला

Sumedh Sankruti's Bekhabar Kashi tu album get good response | सुमेध-संस्कृतीच्या 'बेखबर कशी तू'ला मिळतोय उत्तम प्रतिसाद

सुमेध-संस्कृतीच्या 'बेखबर कशी तू'ला मिळतोय उत्तम प्रतिसाद

ठळक मुद्देसुमेध मुदगलकर व संस्कृती बालगुडेचा रोमँटिक अल्बम 'बेखबर कशी तू'

चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम 'बेखबर कशी तू' नुकताच प्रदर्शित झाला. सेवन सीज मोशन पिक्चर्स आणि व्हिडीयो पॅलेस प्रस्तुत समीर परब आणि संतोष परब निर्मित ओमकार माने आणि जयपाल वाधवानी दिग्दर्शित 'बेखबर कशी तू' ह्या म्युझिक अल्बमच्या लाँचला सुप्रसिध्द फिल्ममेकर संजय जाधव उपस्थित होते.

अल्बम लाँच झाल्यावर फिल्ममेकर संजय जाधव म्हणाले, ''बेखबर कशी तू' गाणे पाहिल्यावर ते पून्हा पून्हा पाहत राहावेसे वाटते. मराठी सिनेसृष्टीत किती प्रतिभावान युवा कलाकार आहेत, हे ह्यावरून सिद्ध होते.''
गीतकार आशिष देशमुख आणि व्यान याने लिहिलेल्या 'बेखबर कशी तू' गीताला संगीतकार व्यान याने संगीतबद्ध केले आहे. आणि रॉकस्टार रोहित राऊतने हे गाणे गायले आहे. लाँच झाल्यानंतर चोवीस तासातच गाण्याला ८० हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले तर गाणे सातव्या स्थानी युट्यूबवर ट्रेंडिंग होते.


रॉकस्टार गायक रोहित राऊत म्हणाला की, 'हा माझा पहिला अल्बम आहे, ज्याला चोविस तासात एवढी भरघोस प्रतिक्रिया मिळाली आहे. मी रसिकांचे आभार मानतो.'
अभिनेता सुमेध मुदगलकरने सांगितले, 'आमच्या म्युझिक अल्बमला मिळालेले हे यश संपूर्ण टीमचे आहे. अतिशय प्रतिकुल वातावरणात संपूर्ण टीमने खूप मेहनतीने गाण्याचे चित्रीकरण केले होते. आमची मेहनत फळाला आली, असे मला वाटते.'


अभिनेत्री संस्कृती बालगुडे म्हणाली, 'देहराडून, हृषिकेश आणि सोनीपतच्या निसर्गरम्य ठिकाणी ह्या म्युझिक अल्बमचे चित्रीकरण झाले आहे. प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असतं, असे एक सुंदर गाणे आपल्यावर चित्रीत व्हावे आणि रसिकांकडून त्या गाण्याला एवढा चांगला प्रतिसाद मिळावा. माझे हे स्वप्न आज पूर्ण झाले. '


 

Web Title: Sumedh Sankruti's Bekhabar Kashi tu album get good response