पुष्कर श्रोत्रीला पितृशोक, वृत्तपत्र वितरणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व सुधाकर श्रोत्रींचं ८९ व्या वर्षी निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 10:06 IST2026-03-02T10:05:21+5:302026-03-02T10:06:04+5:30
सुधाकर श्रोत्री हे वृत्तपत्र वितरणातील मोठं नाव होतं. वृत्तपत्र वितरण व्यवस्थेमध्ये त्यांचं बरंच योगदान होतं

पुष्कर श्रोत्रीला पितृशोक, वृत्तपत्र वितरणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व सुधाकर श्रोत्रींचं ८९ व्या वर्षी निधन
मराठी दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता पुष्कर श्रोत्रीला पितृशोक झाला आहे. त्याचे वडील सुधाकर श्रोत्री यांचं काल निधन झालं. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुधाकर श्रोत्री हे वृत्तपत्र वितरणातील मोठं नाव होतं. वृत्तपत्र वितरण व्यवस्थेमध्ये त्यांचं बरंच योगदान होतं. त्यांनीच या व्यवस्थेला योग्य दिशा दिली. आज ते आपल्यात नाहीत हे समजताच सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात तीन मुलं, सुना आणि नातवंडं परिवार आहे.
सुधाकर श्रोत्री यांचा वृत्तपत्र वितरण व्यवस्थेत एकूण ६५ वर्षांचा कार्यकाळ होता. कामातील त्यांची निष्ठा वाखणण्याजोगी होती. तसंच त्यांना साहित्यातही रस होता. त्यांनी असंख्य कविताही केल्या आहेत. शिवाय वडिलोपार्डित, लेडीज स्पेशल आणि खास सचिन तेंडुलकरवरील त्यांच्या कवितांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. आज सकाळी ८ वाजता विलेपार्ले येथील पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वृत्तपत्र वितरणातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व सुधाकर श्रोत्री यांचे त्यांच्या राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८९ वर्ष होते. त्यांच्या पश्चात लाईटहाऊस लर्निंग शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष तुषार, अभिनेते पुष्कर आणि केतन असे तीन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार… pic.twitter.com/gxMjHkslr4
— Atul Kulkarni Journalist (@kkatul) March 1, 2026
सुधाकर श्रोत्री हे 'पार्लेकर त्रैमासिकाचे संपादक म्हणून शेवटपर्यंत कार्यरत होते. त्यांचा मुलगा पुष्कर श्रोत्री मराठीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. वडिलांप्रमाणेच त्यालाही साहित्याची जाण आणि रस आहे. सुधाकर श्रोत्रींच्या निधनाने त्याच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरपलं आहे. मराठी इंडस्ट्री आणि सामाजिक-साहित्य क्षेत्रातील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.