"आमच्या लेकाच्या लग्नाला टांग मारली..."; सुचित्रा बांदेकरांचा नाराजीचा सूर, अमेय वाघ म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 09:42 IST2026-01-05T09:38:55+5:302026-01-05T09:42:31+5:30
एका सिनेमाच्या प्रीमिअर सोहळ्यात सुचित्रा आणि अमेय वाघमधील हा संवाद चांगलाच व्हायरल झालाय. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

"आमच्या लेकाच्या लग्नाला टांग मारली..."; सुचित्रा बांदेकरांचा नाराजीचा सूर, अमेय वाघ म्हणाला...
काहीच दिवसांपूर्वी अभिनेता सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांचं लग्न झालं. या लग्नाला मराठी सेलिब्रिटींनी उपस्थिती दर्शवली. अनेकांनी सोहम आणि पूजासोबत फोटो काढून या दोघांना आशीर्वाद दिले. सोहम हा अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा. या लग्नाला अमेय वाघ मात्र गैरहजर होता. त्यामुळे एका सिनेमाच्या प्रीमिअरला सुचित्रा यांना अमेय वाघ दिसला आणि पुढे काय घडलं? जाणून घ्या
अमेय वाघच्या एका उत्तराने हशा पिकला
एका मराठी सिनेमाच्या प्रीमिअरला आदेश बांदेकर आणि सुचित्रा उपस्थित होते. तेव्हा सुचित्रा यांचं लक्ष अमेयकडे गेलं. त्यांनी लांबूनच अमेयला हाक मारली आणि म्हणाल्या- ''ओ! अमेय वाघ, तुम्ही आमच्या लेकाच्या लग्नाला टांग मारली...''. सुचित्रा यांचा आवाज ऐकताच अमेय त्यांच्याजवळ येतो. तो त्यांची माफी मागत असताना आदेश बांदेकर अमेयला मिठी मारतात. पुढे अमेय म्हणतो- ''सॉरी, सॉरी, पण हनिमूनवरुन आल्याआल्या मी त्याला भेटेन'', अमेयचं हे उत्तर ऐकून सुचित्रा आणि आदेश दोघेही हसले.
पुढे ते सिनेमाबद्दल गप्पा मारत असताना मागून सिद्धार्थ चांदेकर येतो. तेव्हा आदेश बांदेकर त्याच्याकडेही बोट करुन सुचित्रा यांना सांगतात की, ''हा बघ, हा पण नव्हता आला.'', अशाप्रकारे हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. सुचित्रा आणि सिद्धार्थ यांनी 'झिम्मा' आणि 'झिम्मा २' सिनेमात एकत्र काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्यात मैत्रीपूर्ण संंबंध आहेत. एकूणच मराठी कलाकारांची ऑफस्क्रीन असलेली मजेशीर केमिस्ट्री सर्वांचं लक्ष वेधून गेली.