Wedding Anniversary: सुबोध भावेने असे केले होते मंजिरीला प्रपोज, हटके आहे दोघांची Love Story

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 16:34 IST2021-07-12T15:47:53+5:302021-07-12T16:34:38+5:30

सुबोध भावे आणि मंजिरी यांचे लव्हमॅरेज असून या दोघांची लव्हस्टोरीही सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही. दोघांच्या लव्हस्टोरीला शाळेत असतानाच सुरुवात झाली होती.

Subodh Bhave's special wishes for her wife Manjiri on 20th Anniversary, know about there love story here | Wedding Anniversary: सुबोध भावेने असे केले होते मंजिरीला प्रपोज, हटके आहे दोघांची Love Story

Wedding Anniversary: सुबोध भावेने असे केले होते मंजिरीला प्रपोज, हटके आहे दोघांची Love Story

त्याने तिला पाहिले पहिल्यांदा आणि पहिल्याच नजरेत तिनं त्याला क्लीन बोल्ड केलं. तिला पाहताच त्याच्या दिल की घंटी बजने लगी आणि ती त्याच्या आयुष्यात येताच त्याचं आयुष्यच जणू पालटलं. ही सगळी गोष्ट आहे अभिनेता सुबोध भावेची. सुबोध भावे हा चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावंत आणि हरहुन्नरी अभिनेता आहे. एक उत्तम कलाकार असलेला सुबोध एक प्रेमळ पिताही आहे.

२० वर्षापूर्वी  सुबोध भावे मंजिरीसह  रेशीमगाठीत अडकला होता. दोघांच्या लग्नाचा आज २० वाढदिवस आहे. या खास दिवशी सुबोधनं एक खास पोस्ट शेअर करत मंजिरीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नाचा फोटो शेअर करत त्याला समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. खूप काही न लिहिता 'तू तिथे मी' इतकंच' असे म्हणत हा फोटो चाहत्यांसह शेअर केला आहे.

 

 हा फोटो पाहून चाहत्यांनीही सुबोध आणि मंजिरी यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुबोध आणि मंजिरी यांचे लव्हमॅरेज असून या दोघांची लव्हस्टोरीही सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही. दोघांच्या लव्हस्टोरीला शाळेत असतानाच सुरुवात झाली होती. विशेष म्हणजे सुबोधने मंजिरीला आठवीत असताना प्रपोज केलं होतं. या प्रपोजचं उत्तर मंजिरीने चार दिवस विचार केल्यानंतर दिले होते. पाचव्या दिवशी सुबोधला मंजरीने होकार दिला होता. हळूहळू दोघांचं प्रेम खुलू लागलं आणि दोघंही लग्नबंधनात अडकले.

 लग्नबंधनात अडकण्यापूर्वी मंजिरी आणि सुबोध दोघांनी जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर कुटुंबाच्या सहमतीने दोघांनीही लग्न केले होते.  दोघांच्या लग्नाला आज २० वर्ष पूर्ण झाली असली तरी दोघांच्या भेटीला नुकतीच ३० वर्षही पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या २० वर्षानंतरही दोघांमधील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. मंजिरी खंबीरपणे सुबोधच्या प्रत्येक निर्णयात त्याच्यासोबत असते, त्याला पाठिंबा देते.


 

Web Title: Subodh Bhave's special wishes for her wife Manjiri on 20th Anniversary, know about there love story here