सुबोध भावेच्या नवीन सिनेमाचा मुहुर्त संपन्न, तर 'या' सिनेमातून येणार रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 06:30 IST2019-08-20T06:30:00+5:302019-08-20T06:30:00+5:30

सिनेमाच्या मुहूर्ताला सुभाष घईंसह सुबोध भावे , पुजा सावंत, सुशांत शेलार हे सिनेमातले अन्य कलाकारही उपस्थित होते. विजेता चित्रपटाच्या चित्रीकरणालाही आता सुरूवात झाली आहे.

Subodh Bhave's new marathi Movie Vijeta | सुबोध भावेच्या नवीन सिनेमाचा मुहुर्त संपन्न, तर 'या' सिनेमातून येणार रसिकांच्या भेटीला

सुबोध भावेच्या नवीन सिनेमाचा मुहुर्त संपन्न, तर 'या' सिनेमातून येणार रसिकांच्या भेटीला

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावेने विविध भूमिका सक्षमपणे साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आता तो लवकरच नवीन भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'विजेता' या सिनेमातून तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. ही भूमिका वास्तविक वाटण्यासाठी सुबोध खूप मेहनत घेतो आहे. नुकताच या सिनेमाचा मुह्रुर्त पार पडला. अमोल शेडगे  या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून सुभाष घईंच्या मुक्ता आर्ट्स ह्या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 

सुबोधसह या सिनेमात माधव देवचकेही झळकणार आहे. खुद्द माधवनेच मुह्रूर्त झाल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही गुड न्युज शेअर केली आहे. सिनेमाच्या मुहूर्ताला सुभाष घईंसह सुबोध भावे , पुजा सावंत, सुशांत शेलार हे सिनेमातले अन्य कलाकारही उपस्थित होते. विजेता चित्रपटाच्या चित्रीकरणालाही आता सुरूवात झाली आहे. 

 

 

बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वात स्पर्धक म्हणून गेलेला अभिनेता माधव देवचकेने जरी ट्रॉफी जिंकली नसली तरीही प्रेक्षकांची मनं जिंकली. यारों का यार म्हणून ओळखला जाणारा माधव देवचके बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच त्याला शोमॅन सुभाष घईंचा चित्रपट मिळाला आहे. सुभाष घईंच्या मुक्ता आर्ट्स ह्या चित्रपट निर्मिती संस्थेच्या अमोल शेडगे दिग्दर्शित विजेता ह्या सिनेमात माधव देवचके मुख्य भूमिकेत दिसेल.

 

Web Title: Subodh Bhave's new marathi Movie Vijeta