सुबोध भावे सांगतोय, या ठिकाणी आपण नतमस्तक व्हावं आणि आशीर्वाद मागावा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 08:30 IST2018-11-20T08:30:00+5:302018-11-20T08:30:02+5:30

सुबोधने नुकताच त्याचा एक फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला असून हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तो एका समाधीसमोर हात जोडून बसला असल्याचे दिसून येत आहे.

subodh bhave visited chhatrapati sambhaji maharaj samadhi place | सुबोध भावे सांगतोय, या ठिकाणी आपण नतमस्तक व्हावं आणि आशीर्वाद मागावा....

सुबोध भावे सांगतोय, या ठिकाणी आपण नतमस्तक व्हावं आणि आशीर्वाद मागावा....

ठळक मुद्देसुबोधने त्याच्या फोटोसोबत एक कॅप्शन लिहिली आहे. त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, आज छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन झालं. त्यांनी घडवलेल्या महाराष्ट्रात शांतता आणि एकोपा राहावा, शेतकरी बांधवांना आणि येथील नागरिकांना आनंदानी जगता यावं अशी परिस्थिती निर्माण करण्याची ताकद आपल्या सर्वांच्या अंगी

सुबोध भावे सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून नेहमीच त्याच्या फॅन्सच्या संपर्कात असतो. त्यामुळे इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचे फॅन्स त्याला मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. तो कुठे जातो, काय करतोय हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुबोध त्याच्या फॅन्सना सांगत असतो. तसेच त्याच्या कुटुंबियांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याने नुकताच त्याचा एक फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला असून हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तो एका समाधीसमोर हात जोडून बसला असल्याचे दिसून येत आहे. ही समाधी कोणाची आहे हे त्यानेच त्याच्या पोस्टमध्ये सांगितले आहे.

सुबोधने त्याच्या फोटोसोबत एक कॅप्शन लिहिली आहे. त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, आपण नतमस्तक व्हावं आणि आशीर्वाद मागावा... आज छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन झालं. त्यांनी घडवलेल्या महाराष्ट्रात शांतता आणि एकोपा राहावा, शेतकरी बांधवांना आणि येथील नागरिकांना आनंदानी जगता यावं अशी परिस्थिती निर्माण करण्याची ताकद आपल्या सर्वांच्या अंगी येवो असा आशीर्वाद मागितला. जय भवानी, जय शिवराय, जय शंभुराजे, जय महाराष्ट्र...

सुबोधची ही पोस्ट आणि त्याचा हा फोटो त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. केवळ १५ तासांत ४४ हजारांहून अधिक लोकांनी सुबोधचा हा फोटो लाईक केला असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सुबोध भावे सध्या तुला पाहाते रे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून ही मालिका टिआरपीच्या रेसमध्ये अव्वल ठरत आहे. तर सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला आणि डॉ. काशिनाथ घाणेकर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच गाजत असून या चित्रपटात सुबोधने साकारलेली काशिनाथ घाणेकर यांची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहे. सुबोधने आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. 

Web Title: subodh bhave visited chhatrapati sambhaji maharaj samadhi place