सुबोध भावे आणि तेजस्विनी पंडित 'या' सिनेमात झळकणार एकत्र, जाणून घ्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 07:00 IST2021-04-27T07:00:00+5:302021-04-27T07:00:02+5:30

अभिनेता सुबोध भावे आणि तेजस्विनी पंडित यांची जोडी तब्बल एका दशकानंतर रुपरी पडद्यावर रसिकांना एकत्रित दिसणार आहे.

Subodh bhave and tejaswini Pandit will be seen together in vartman marathi movie | सुबोध भावे आणि तेजस्विनी पंडित 'या' सिनेमात झळकणार एकत्र, जाणून घ्याबद्दल

सुबोध भावे आणि तेजस्विनी पंडित 'या' सिनेमात झळकणार एकत्र, जाणून घ्याबद्दल

अभिनेता सुबोध भावे आणि तेजस्विनी पंडित यांची जोडी तब्बल एका दशकानंतर रुपरी पडद्यावर रसिकांना एकत्रित दिसणार आहे. ‘वर्तमान’  हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून पत्रकारिता, राजकारण, समाजकारण यावरती थेट भाष्य करणारा हा चित्रपट आहे. हेमंत पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून पाटील म्हणाले की सध्याच्या परिस्थिती मध्ये आमदार खासदार आणि नेतेमंडळी यांचा जनतेशी व सर्वसामान्य नागरिकांशी वागण्याचा व पाहण्याचा दृष्टिकोण हा वेगळाच असतो. अशा ज्वलंत विषयावर या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

या चित्रपटात सुबोध भावे, मंगेश देसाई, राहुल सोलापूरकर, कुलदीप पवार, अवतार गिल, तेजस्विनी पंडित, संजय मोहिते अशा अनेक कलाकारांनी अभिनय केला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत दुधगावकर यांनी केले असून संगीत हर्षित अभिराज यांचे आहे. तर चित्रपट लेखन संजय पवार यांनी केले आहे

हा चित्रपट मे महिन्यामध्ये प्रदर्शित होणार असून महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहात हा चित्रपट एकाच वेळी सर्वत्र प्रदर्शित होणार अशी माहिती चित्रपटाचे निर्माते हेमंत पाटील यांनी दिले ते पुढे म्हणाले की मराठीतील मल्टीस्टारर व दर्जात्मक कथानक असलेला चित्रपट रसिकांच्या मनाचा ठाव घेईल यात मात्र शंका नाही.
 

Web Title: Subodh bhave and tejaswini Pandit will be seen together in vartman marathi movie