सुबोध भावे आणि तेजश्री प्रधानचा 'हॅशटॅग तदेव लग्नम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 13:11 IST2023-06-01T13:11:04+5:302023-06-01T13:11:26+5:30

Subodh Bhave And Tejashree Pradhan : अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच एकत्र झळकणार आहेत.

Subodh Bhave and Tejashree Pradhan's 'Hashtag Tadeo Lagnam' | सुबोध भावे आणि तेजश्री प्रधानचा 'हॅशटॅग तदेव लग्नम'

सुबोध भावे आणि तेजश्री प्रधानचा 'हॅशटॅग तदेव लग्नम'

मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) लवकरच एकत्र झळकणार आहेत. ते दोघे 'हॅशटॅग तदेव लग्नम' या चित्रपटात दिसणार आहेत. हा कौटुंबिक चित्रपट असून नुकताच या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला आहे. नावावरूनच हा चित्रपट लग्न संस्थेवर भाष्य करणारा दिसतो आहे.शेखर मते निर्मित या चित्रपटाची कथा आणि पटकथा आनंद दिलीप गोखले यांचीच आहे. या चित्रपटासाठी मंदार चोळकर आणि क्षितीज पटवर्धन यांनी गीतलेखन केलं आहे तर पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, नुकतीच आम्ही चित्रीकरणाला सुरुवात केली असून सध्या चित्रपटाबद्दलच्या अनेक गोष्टी पडद्याआड आहेत. लग्नसंस्थेवर आधारित जरी हा चित्रपट असला तरी याची कथा खूप वेगळी आहे. एका परिपक्व नातेसंबंधावर प्रकाशझोत टाकणारी ही कथा आहे. यापूर्वी असा विषय क्वचितच कोणी हाताळला असेल. हा एक कौटुंबिक मनोरंजनात्मक आणि सहकुटुंब बघावा, असा हा सिनेमा असून लवकरच हा चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. यात अनेक नामांकित कलाकार आहेत.  


तर निर्माते शेखर मते म्हणतात, हा विषय मला ऐकता क्षणीच भावाला आणि त्वरित या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांना हा विषय निश्चितच आवडेल. सुबोध आणि तेजश्रीचे चाहते या चित्रपटात त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Web Title: Subodh Bhave and Tejashree Pradhan's 'Hashtag Tadeo Lagnam'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.