​जागतिक कलाकारांच्या मेळाव्यात सुबिर हाती करणार प्रतिनिधित्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 19:21 IST2016-04-20T13:51:18+5:302016-04-20T19:21:18+5:30

‘ग्लेनफिडिच एमर्जिंग आर्टिस्ट आॅफ इयर 2016’ या पुरस्कार विजिते कलाकार सुबीर हाती आता स्कॉटलँडमध्ये होणाऱ्या जागतिक कलाकारांच्या मेळाव्यात भारताचे ...

Subhash will represent the gathering of global artists | ​जागतिक कलाकारांच्या मेळाव्यात सुबिर हाती करणार प्रतिनिधित्व

​जागतिक कलाकारांच्या मेळाव्यात सुबिर हाती करणार प्रतिनिधित्व

्लेनफिडिच एमर्जिंग आर्टिस्ट आॅफ इयर 2016’ या पुरस्कार विजिते कलाकार सुबीर हाती आता स्कॉटलँडमध्ये होणाऱ्या जागतिक कलाकारांच्या मेळाव्यात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. संपूर्ण देशातील 610 कलाकारांमधून सुबीरची निवड करण्यात आली.

संपूर्ण जगातून निवडलेले विजेते स्कॉटलँडमध्य ग्लेनफिडिच डिस्टिलरी येथे तीन महिने ‘आर्टिस्ट्स इन रेसिडन्स’ (एआयआर) कार्यक्रमाअंतर्गत राहणार आहेत. तसेच सुबीर यांना दहा लाख रुपयांचे बक्षीस आणि आर्ट डिस्ट्रिक्ट गॅलरीमध्ये कलाप्रदर्शन करण्याचा मान मिळणार आहे.

सुबीर सांगतो, लोककला आणि शहरी कला यांचा सुगम संगम चितारण्याचा मी प्रयत्न करत असतो. लोककला मला नेहमीच प्रेरित करतात. आर्ट आणि डिझाईनच्या माध्यमातून माझा व्यूव मांडत असतो.

ग्लेनफिडिच एआयआर प्रोग्रामचे जागतिक समन्वयक अँडी फेअरग्रीव्ह म्हणतात की, भारतामध्ये कलेचे मार्केट वाढत आहे. नवनवीन कलाकार आता येथे निर्माण होत आहेत.

गॅलरी मालक, कलासमीक्षक, कलाकारा आणि संग्राहकांच्या तेरा सदस्यांच्या परीक्षक पॅनलने सुमारे 2500 चित्रांमधून फायनल पाचची निवड केली.

Web Title: Subhash will represent the gathering of global artists