मराठमोळ्या दीप्ती सतीने साडीत केलं स्टायलिश फोटोशूट, दिसतेय खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 14:19 IST2021-03-20T14:18:34+5:302021-03-20T14:19:26+5:30

अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

Stylish photoshoot done by deepti sati, looks very beautiful | मराठमोळ्या दीप्ती सतीने साडीत केलं स्टायलिश फोटोशूट, दिसतेय खूपच सुंदर

मराठमोळ्या दीप्ती सतीने साडीत केलं स्टायलिश फोटोशूट, दिसतेय खूपच सुंदर

अभिनेत्री दीप्ती सती सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. दीप्ती तिचे हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या फोटोतील अंदाज तिच्या फॅन्सनादेखील चांगलाच भावतो. दीप्तीने तिचे ट्रेडिशनल लूकमधील फोटोशूट शेअर करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दीप्तीने व्हाईट रंगाच्या स्टायलिश साडीत फोटोशूट शेअर केलं आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसते आहे. साडीत तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे. चाहत्यांनादेखाल तिचा हा सिंपल लूक भावला आहे, त्यांनी या फोटांवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले. इतकेच नाही तर या चित्रपटात दीप्ती बोल्ड व ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली.

इतकेच नाही तर ती या चित्रपटात बिकनीमध्ये देखील दिसली. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती. या सिनेमासाठी दीप्तीची निवड 96 मुलींच्या ऑडिशन्समधून झाली होती. मराठी सिनेमांमध्ये जरी दीप्तीचा वावर कमी दिसत असला तरी साऊथमध्ये दीप्तीचा चांगलाच बोलबाला आहे.

Web Title: Stylish photoshoot done by deepti sati, looks very beautiful