विशेष मुलांची कहानी लालबागची राणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 16:23 IST2016-06-01T10:53:31+5:302016-06-01T16:23:31+5:30

विशेष मुले देखील सर्वसामान्य प्रमाणे जगू शकतात. त्यांना ही ती स्पेस दया, त्यांना सहानुभूती दाखवू नका. तिला जगण्यासाठी मोकळीकता ...

The story of the special children Lalbaugchi Queen | विशेष मुलांची कहानी लालबागची राणी

विशेष मुलांची कहानी लालबागची राणी

शेष मुले देखील सर्वसामान्य प्रमाणे जगू शकतात. त्यांना ही ती स्पेस दया, त्यांना सहानुभूती दाखवू नका. तिला जगण्यासाठी मोकळीकता दया त्याचबरोबर या चित्रपटात विशेष मुलीची भूमिका साकारणारी वीणा जामकर हिला देखील ती विशेष असली तरी आपण काहीतरी खास आहोत या भावनेने कोणते ही तक्रार न करता आनंदाने जगत असते. नेमकी हाच विचार समाजापर्यत लालबागची राणी या चित्रपटाच्या माध्यमातून  पोहोचवायचा असल्याचे  दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी लोकमत भेटीदरम्यान सांगितले. यावेळी अभिनेता अशोक शिंदे, प्रथमेश परब, पार्थ भालेराव, लेखक रोहन घुगे, संगीतकार रोहित नागभिडे हे कलाकार उपस्थित होते.
       या चित्रपटाच्या एकदम शेवटच्या क्षणी मी या चित्रपटात सहभागी झालो आहे. तसेच या चित्रपटाचा अनुभव पण खरचं एकदम छान होता. त्याच्यातल आत्मानंद नावाची भूमिका असून, तो एका विशेष मुलीला भेटल्यावर त्याचा आत्मानंद कसा जागा होता ते या चित्रपटात दाखविले असल्याचे प्रथमेशने सांगितले. 
       नितिन परूळकरच्या भूमिकेत असून त्यांनी विशेष मुलीच्या वडिलांची भूमिका पार पाडली. या चित्रपटात आपल्या मुलीला अत्यंत सामान्य मुलीसारखे ट्रीट केले आहेत. तिला कोणत्याही प्रकारची वाईट वागणूक न देता तिला आनंदाने जगण्यासाठी प्रोत्साहन दिले. अशा जागृक पालकाची भूमिका समाजापर्यत पोहचविण्याचा प्रयत्न केला असल्याचे अभिनेता अशोक शिंदे यांनी सांगितले.
पार्थनेदेखील लोकमत सीएनएक्सशी बोलताना म्हणाला, लक्ष्मण सराकडून खूप काही शिकण्यास मिळाले. तसेच सिनीअर कलाकारांसोबत काम करताना देखील खूप आनंद झाला. 
       रोहन घुगे यांच्या लिखाणातून नक्कीच एक वेगळा विषय समाजापर्यत पोहोचणार आहे. तर  रोहित नागभिडे यांच्या संगीताने चार चॉद लागले आहेत हे नक्की.हा चित्रपट ३ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


            

Web Title: The story of the special children Lalbaugchi Queen