​‘सैराट’ची कथा माझ्या कांदबरीतून चोरली, लेखक कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 13:18 IST2016-06-19T07:48:09+5:302016-06-19T13:18:09+5:30

संपूर्ण भारतालाच नव्हे तर विदेशातील चाहत्यांनाही याड लावणाऱ्या सैराट चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस शिगेला पोहचत असतानाच या चित्रपटाची कथा आपल्या ...

The story of 'Sarat' stole from my kandabari, writer in court | ​‘सैराट’ची कथा माझ्या कांदबरीतून चोरली, लेखक कोर्टात

​‘सैराट’ची कथा माझ्या कांदबरीतून चोरली, लेखक कोर्टात

पूर्ण भारतालाच नव्हे तर विदेशातील चाहत्यांनाही याड लावणाऱ्या सैराट चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस शिगेला पोहचत असतानाच या चित्रपटाची कथा आपल्या कादंबरीवरुन चोरल्याचा दावा कादंबरीकार नाथ माने यांनी केला आहे.

 ‘बोभाटा’ या आपल्या कादंबरीतून नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’ चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप माने यांनी पनवेल कोर्टात केला आहे. फसवणूक आणि कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी निर्मात्यांसह सात जणांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी नाथ मानेंनी न्यायाधीशांकडे केली आहे.

माने सध्या कामोठे परिसरात राहत असून ते मूळ साताऱ्यातील माण तालुक्यातल्या धकटवाडीचे आहेत. २०१० मध्ये त्यांनी ‘बोभाटा’ कादंबरी लिहिली होती. सुप्रसिद्ध लेखक द. मा. मिरासदार यांनी या कादंबरीची प्रस्तावना लिहिली आहे. एका खेडेगावातील आंतरजातीय प्रेमसंबंधांची कथा या कादंबरीत उतरविण्यात आली आहे.

नाथ माने यांना आपल्या कादंबरीवर चित्रपट काढायचा होता. झी टॉकिज आणि एस्सेल ग्रुपच्या काही अधिकाऱ्याची भेट घेतल्याचा दावाही त्यांनी न्यायालयात केला आहे. मात्र वारंवार इमेलद्वारे संपर्क साधूनही कोणताच प्रतिसाद न दिल्याने त्यांनी कोर्टाचे दार ठोठावल्याचं म्हटलं आहे.

Web Title: The story of 'Sarat' stole from my kandabari, writer in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.