स्पृहा जोशीचा हा फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 11:37 IST2019-10-07T11:34:58+5:302019-10-07T11:37:41+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे.. आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत.

Spruha joshi share her a new photo on social media | स्पृहा जोशीचा हा फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

स्पृहा जोशीचा हा फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे.. आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत. 'मोरया', 'पैसा पैसा' यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. नुकताच तिचा 'बाबा' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला असून तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. याशिवाय छोट्या पडद्यावरही मालिकांमधून तिने जादू दाखवली आहे. स्पृहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि कविता तसंच विचार शेअर करत असते. 


स्पृहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत स्पृहाने चॉकलेटी रंगाचा गाऊन घातला  आहे. गाऊनमध्ये स्पृहाचे सौंदर्य जास्तच खुलून दिसते आहे. स्पृहा या फोटोत खूपच सुंदर दिसत असल्याचे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे. 


स्पृहा अभिनयासोबतच एक चांगली लेखिका आणि उत्तम कवियत्री आहे. छोट्या पडद्यावरील बच्चे कंपनीच्या रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालन करून तिने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची मने जिंकली आहेत. अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, उंच माझा झोका यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली.

या सगळ्याच मालिकांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. या मालिकेतील तिच्या भूमिकांची नाव देखील आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहेत.

Web Title: Spruha joshi share her a new photo on social media